Saturday, October 31, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

सास्तूर निवासी दिव्यांग शाळेने ३८ पदके मिळवित सलग २० व्या वर्षी पटकावले विजेतेपद

by admin
in आपला जिल्हा, लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, उस्मानाबाद द्वारा दिव्यांगांच्या विशेष शाळा, कर्मशाळा व मतिमंद बालगृहातील दिव्यांग मुला-मुलींच्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे दिनांक २ व ३ डिसेंबर या कालावधीत श्री तुळजाभवानी स्टेडियम व छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, उस्मानाबाद येथे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेत ६०० पेक्षा जास्त खेळाडू अस्थिव्यंग, मूकबधिर, मतिमंद व अंध प्रवर्गातून सहभागी झाले होते. सास्तूर निवासी दिव्यांग शाळेतील दिव्यांग खेळाडूंनी आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करीत २१ सुवर्ण, ९ रजत व ८ कांस्य अशी एकूण ३८ पदके जिंकून सलग २० व्या वर्षी क्रीडा स्पर्धेतील जनरल चॅम्पियनशिप पटकावून विक्रम स्थापित केला. प्रशालेतील दिव्यांग खेळाडूंनी आपल्यातील शारीरिक कमतरतेवर मात करीत यश संपादित केले आहे.
आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त दि. २ व ३ डिसेंबर या कालावधीत स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेचे उदघाटन अप्पर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प अधिकारी पी.पी.शिंदे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी केंद्रे, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरणाळे व जिल्हा समाजकल्याण अधिकारी नागनाथ चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच दिनांक ३ डिसेंबर २०२२ रोजी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, उस्मानाबाद येथे घेण्यात आलेल्या सांस्कृतिक स्पर्धेत प्रशालेतील दिव्यांग कलाकार विद्यार्थ्यांनी ताराराणी यांच्या पराक्रमावर आधारीत ऐतिहासिक नृत्य सादर करून उपस्थित रसिक प्रेक्षकांची मने जिंकत सलग २१ व्या वर्षी या सांस्कृतिक स्पर्धेतील विजेतेपदाला गवसणी घातली. या नृत्यामध्ये ताराराणी यांच्या भूमिकेत कु. अदिती गायकवाड ही विद्यार्थीनी होती. तर संताजी,धनाजीच्या भूमिकेत अलीम चौधरी व सिद्धेश्वर मनाळे या दिव्यांग विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. संध्याराणी कदम, अभिषेक धानूरे, सुर्या शिंदे,भाग्यश्री कांबळे,भाग्येश इस्लामपूरे,किरण खराते,विश्वजीत बिराजदार, महेश पवार,साक्षी नाईक यांनी मावळ्यांच्या भूमिकेत तर प्रशांत कांबळे याने मुघल सरदाराच्या भूमिकेत नृत्यात सहभाग घेतला.

\"सांस्कृतिक

क्रीडा स्पर्धेतील विजयी खेळाडू खालीलप्रमाणे –
——————————————-
अस्थिव्यंग \’अ\’- ८ ते १२ वयोगट मुले- प्रणव अडसूळ -५० मीटर व १०० मीटर धावणे- सुवर्णपदक, अदिती गायकवाड-५० मीटर व १०० मीटर धावणे-सुवर्णपदक, वयोगट-१३ ते १६- भाग्येश इस्लामपूरे-१०० मीटर धावणे-सुवर्णपदक, साक्षी नाईक ५० मीटर व १०० मीटर धावणे-सुवर्णपदक, वयोगट १७ ते २१- रोहित वाघमारे -१०० मीटर धावणे-सुवर्णपदक, मुस्कान बागवान -१०० मीटर व २०० मीटर धावणे- सुवर्णपदक

अस्थिव्यंग \’ब\’ गट- २५ मीटर भरभर चालणे- पृथ्वीराज सुरवसे -सुवर्णपदक, गीताश्री निळे -२५ मीटर भरभर चालणे-सुवर्णपदक, १३ ते १६- अभिषेक धानुरे- ५० मीटर धावणे- सुवर्णपदक

अस्थिव्यंग \’क\’- ८ ते १२ वयोगट- संगीता काळे -२५ मीटर भरभर चालणे-सुवर्णपदक,१३ ते १६ वयोगट- रितेश देशमुख – ५० मीटर व्हीलचेअर रेस व व्हीलचेअर वर बसून सॉफ्टबाॅल थ्रो- सुवर्णपदक, करण माने – ५० मीटर धावणे-सुवर्णपदक, संध्याराणी कदम -५० मीटर धावणे व व्हीलचेअर वर बसून सॉफ्ट बाॅल थ्रो- सुवर्णपदक, राणी मनाळे-५० मीटर व्हीलचेअर रेस-सुवर्णपदक, वयोगट १७ ते २१- राज गायकवाड -१०० मीटर व्हीलचेअर रेस- सुवर्णपदक

\"निवासी

जिल्हास्तरीय स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते खेळाडू आगामी महिन्यात दिव्यांग कल्याण विभागाच्या वतीने बालेवाडी, पुणे येथे आयोजित करण्यात येत असलेल्या दिव्यांगांच्या राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धेत उस्मानाबाद जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. प्रशालेतील सर्व विजयी खेळाडूंचे जिल्हा समाजकल्याण अधिकारी नागनाथ चौगुले, वै.सा.का.भारत कांबळे, सहाय्यक सल्लागार सुभाष शिंदे, श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव निर्मलाताई बदामे, प्रशालेचे मुख्याध्यापक बी.टी.नादरगे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रवीण वाघमोडे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून अभिनंदन करण्यात आले.

Ad 2
Ad 1
Tags: निवासी दिव्यांग शाळा
Previous Post

माकणी येथील सिध्देश्वर यात्रा महोत्सवाला उद्यापासून सुरुवात

Next Post

लोहारा येथे आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त विधी साक्षरता शिबिर संपन्न

Related Posts

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

Next Post

लोहारा येथे आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त विधी साक्षरता शिबिर संपन्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!