Wednesday, September 30, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

आ. विक्रम काळे विजयी झाल्याबद्दल लोहाऱ्यात जल्लोष

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
मराठवाडा शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम काळे यांनी विजय प्राप्त केल्याने लोहारा शहरात शुक्रवारी (दि. ३) राष्ट्रवादी शिक्षक संघटना लोहारा तालुका व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून पेढे भरवत जल्लोष केला.
मराठवाडा शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (दि.२) औरंगाबाद येथे पार पडली. यात महाविकास आघाडीचे उमेदवार व विद्यमान आमदार विक्रम काळे यांनी चौथ्यांदा विजय प्राप्त करून हा मतदारसंघ ताब्यात ठेवला आहे. आ. विक्रम काळे विजयी झाल्याबद्दल लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाविकास आघाडीच्या पदाधिकारी यांनी फटाके फोडून जल्लोष केला. यावेळी युवासेना तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, कानेगावचे सरपंच नामदेव लोभे, नगरसेवक प्रशांत काळे, के. डी. पाटील, जुक्टा संघटनेचे लोहारा तालुकाध्यक्ष प्रशांत काळे, प्रा. सुनील बहिरे, प्रा. राजेंद्र साळुंके, प्रा. आर. सी. अष्टेकर, प्रा. कुलकर्णी सर, दत्ता जावळे, अंकुश शिंदे, हरी लोखंडे, शाम नारायणकर, रघुवीर घोडके, आयनोद्दीन सवार, प्राचार्य दौलतराव घोलकर, जी. डी. मैंदाड, प्रकाश भगत, तानाजी जाधव, डी. एम. पोतदार, एम. टी. भोसले, एस. के. जाधव, बी. जे. मनोहर, बी. एस. स्वामी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

९५ वर्षीय वृद्ध महिलेचे देहदान – मरणोत्तर देहदान करून समाजासमोर ठेवला आदर्श

Next Post

लोहारा तालुक्यातील भोसगा येथील धर्मवीर संभाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांना सायकल वाटप

Related Posts

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

लोहारा तालुका

लोहारा येथे महात्मा बसवेश्वर मंदिर जीर्णोद्धार निमित्त विधिवत पुजा आणि संकल्प

Next Post

लोहारा तालुक्यातील भोसगा येथील धर्मवीर संभाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांना सायकल वाटप

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!