Wednesday, September 30, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

धानुरी येथील विद्यामाता इंग्लिश स्कुलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

by admin
in ब्रेकिंग, लोहारा तालुका, शैक्षणिक
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील धानुरी येथील विद्यामाता इंग्लिश स्कुलचे वार्षिक स्नेहसंमेलन शुक्रवारी (दि.३) रात्री उत्साहात संपन्न झाले. विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या गीतांवर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शितल खिंडे या होत्या. यावेळी शेतकरी विकास संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अशोकराव जवळगे, किशोर साळुंके, दिपक जवळगे यांची प्रमुख उपस्थिती होती. शाळेच्या मुख्याध्यापिका हिरा सोलापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी विविध कला सादर केल्या. त्यामध्ये पारंपारिक गीत, शेतकरी नृत्य, मोबाईल थीम व फनी डान्स, लावणी, व लोकगीत, हिंदी गीतासह विविध प्रकारच्या गीतांवर नृत्य सादर केले. तसेच विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित नाटिका सादर केली. नर्सरी पासून सर्व बाल कलाकारांनी आपली कला सादर केली. तसेच दापोली येथे लाटी काठी अजिंक्यपद स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवलेल्या व ऑलंपियाड परीक्षेमध्ये सुवर्णपदक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

\"वार्षिक \"\"
या कार्यक्रमासाठी पालकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. अतिशय मनमोहक, आकर्षक व नवचेतना देणारी कला या ठिकाणी मुलांनी सादर केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओम सूर्यवंशी यांनी तर सुनील कांबळे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलेची निवडक फोटो – 

\"\" \"\" \"\" \"\" \"\" \"\" \"\" \"\"

Previous Post

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी

Next Post

अनावश्यक खर्च टाळून निवासी दिव्यांग शाळेत वाढदिवस साजरा – फावडे कुटुंबीयांचा अनोखा उपक्रम

Related Posts

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

लोहारा तालुका

लोहारा येथे महात्मा बसवेश्वर मंदिर जीर्णोद्धार निमित्त विधिवत पुजा आणि संकल्प

Next Post

अनावश्यक खर्च टाळून निवासी दिव्यांग शाळेत वाढदिवस साजरा - फावडे कुटुंबीयांचा अनोखा उपक्रम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!