Wednesday, September 30, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

मतदारसंघाच्या विकासासाठी सदैव कटीबद्ध – आमदार ज्ञानराज चौगुले – तावशीगड येथे – स्थानिक विकास निधी अंतर्गत बांधण्यात आलेल्या सभामंडपाचे लोकार्पण

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील तावशीगड येथील जागृत महादेव मंदीर येथे महाशिवरात्रीनिमित्त आयोजीत कार्यक्रमात आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत बांधण्यात आलेल्या सभामंडपाचा लोकार्पण सोहळा चिरकापाटी तावशीगड येथे संपन्न झाला.
यावेळी तावशीगड येथे नाबार्ड अंतर्गत पुल बांधणेसाठी २ कोटी ७५ लक्ष रूपये मंजुर केल्याबद्दल गावकऱ्यांनी आमदार ज्ञानराज चौगुले यांचा सत्कार केला. सत्काराला उत्तर देताना आमदार ज्ञानराज चौगुले यांनी नागरिकांच्या सोयीसाठी विविध विकास कामे करणे हे तर माझे कर्तव्य असुन मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव कटीबद्ध असल्याची ग्वाही यावेळी उपस्थितांना दिली. या कार्यक्रमासाठी गुरुवर्य श्यामचैतन्य महाराज, ह.भ.प.शंकर महाराज उदतपुरकर, युवानेते किरण गायकवाड, जिल्हाप्रमुख मोहन पनुरे, तालुकाप्रमुख जगन पाटील, माजी नगरसेवक अभिमान खराडे, दिपक रोडगे, ओम कोरे, सरपंच मधुमती राजपाल पाटील, कुलकर्णी, राम माडोळे, राम मिटकरी, शेषेराव बिराजदार, धीरज घोटाळे, हरिसिंग राजपुत, काशिनाथ मिटकरी आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

\"ज्ञानराज

Tags: आमदार ज्ञानराज चौगुले
Previous Post

लोहारा येथील महाशिवरात्री यात्रा महोत्सवास मोठ्या उत्साहात सुरुवात – विविध कार्यक्रमांचे आयोजन

Next Post

उदगीरचा निवृत्ती गुडेवार ठरला मॅरेथॉनचा विजेता – महाशिवरात्री यात्रामहोत्सवानिमित्त लोहाऱ्यात मॅरेथॉन स्पर्धा संपन्न

Related Posts

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

लोहारा तालुका

लोहारा येथे महात्मा बसवेश्वर मंदिर जीर्णोद्धार निमित्त विधिवत पुजा आणि संकल्प

Next Post

उदगीरचा निवृत्ती गुडेवार ठरला मॅरेथॉनचा विजेता - महाशिवरात्री यात्रामहोत्सवानिमित्त लोहाऱ्यात मॅरेथॉन स्पर्धा संपन्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!