Wednesday, September 30, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

उदगीरचा निवृत्ती गुडेवार ठरला मॅरेथॉनचा विजेता – महाशिवरात्री यात्रामहोत्सवानिमित्त लोहाऱ्यात मॅरेथॉन स्पर्धा संपन्न

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरात महाशिवरात्री यात्रा महोत्सवानिमित्त सोमवारी ( दि. २०) सकाळी आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत उदगीरचा निवृत्ती गुडेवार प्रथम तर विष्णु गणेश सुरवसे याने व्दितीय क्रमांक पटकावला आहे.
या स्पर्धेचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सकाळी ८ च्या सुमारास ही मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाली. ही स्पर्धा शिवाजी चौक ते जेवळी रोड भदभदी येथून परत शिवाजी चौक अशी तीन किमीची होती. या मॅरेथॉन स्पर्धेसाठी उस्मानाबाद जिल्ह्यासह लातुर परीसरातील एकुण ४९ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेत उदगीरचा निवृत्ती गुडेवार प्रथम, विष्णु गणेश सुरवसे याने व्दितीय, अजय भातागळे, होर्टी याने तृतिय तर कास्ती येथील आदिनाथ बेशकराव याने चतुर्थ क्रमांक पटकावला आहे. स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिस वितरण करण्यात आले.

\"मॅरेथॉन\"

यावेळी डॉ. बाळासाहेब भुजबळ, राजेंद्र फावडे, बालाजी माशाळकर, गोपाळ सुतार, दत्ता निर्मळे, अमित बोराळे, विरेश स्वामी, सतीश ढगे, भीमाशंकर डोकडे, ईश्वर बिराजदार, सुनील देशमाने, महेश कुंभार, प्रथमेश मुळे, शैलेश जट्टे, व्यंकट चिकटे, राजपाल वाघमारे, जितेश फुलकुर्ते, मनोज लोहार आदींसह यात्रा कमिटीचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

Tags: महाशिवरात्री
Previous Post

मतदारसंघाच्या विकासासाठी सदैव कटीबद्ध – आमदार ज्ञानराज चौगुले – तावशीगड येथे – स्थानिक विकास निधी अंतर्गत बांधण्यात आलेल्या सभामंडपाचे लोकार्पण

Next Post

लातूरचा विष्णू तातपुरे ठरला यावर्षीचा लोहारा केसरी – रामलिंग मुदगडचा प्रदीप गोरे उपविजेता

Related Posts

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

लोहारा तालुका

लोहारा येथे महात्मा बसवेश्वर मंदिर जीर्णोद्धार निमित्त विधिवत पुजा आणि संकल्प

Next Post

लातूरचा विष्णू तातपुरे ठरला यावर्षीचा लोहारा केसरी - रामलिंग मुदगडचा प्रदीप गोरे उपविजेता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!