Thursday, October 1, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

विविध गीतांवर नृत्य करून चिमुकल्यांनी जिंकली उपस्थितांची मने – नागुर येथील राजमाता प्री प्रायमरी इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील नागूर येथील राजमाता प्री प्रायमरी इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन शनिवारी ( दि.४) सायंकाळी मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी चिमुकल्यांनी विविध गीतांवर नृत्य करत उपस्थितांची मने जिंकली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोहाऱ्याच्या नगराध्यक्षा वैशाली अभिमान खराडे या होत्या. तर उद्घाटक म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य दिपक जवळगे होते. या कार्यक्रमासाठी नागुरच्या सरपंच अर्चना कांबळे, लोहारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिनकरराव जावळे, विकास पाटील, लोहाऱ्याचे उपनगराध्यक्ष आयुब शेख, शिवसेना तालुकाप्रमुख जगन्नाथ पाटील, नगरसेविका सारिका प्रमोद बंगले, सुमन दिपक रोडगे, नितीन पाटील, बाबासाहेब जाधव, सुरेंद्र पाटील, शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष अकबर तांबोळी, प्रवीण चंदनशिवे, राजमाता स्कुलचे मुख्याध्यापक तानाजी पाटील, शाम पाटील, तुकाराम मोरे, सतीश कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती.

\"स्नेहसंमेलन\"

\"स्नेहसंमेलन\"
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या वार्षिक स्नेहसंमेलनात नर्सरी, एलकेजी, युकेजी वर्गातील विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी चित्रपटातील गीतांबरोबर लावणी, फनी डान्स, देशभक्तीपर गीत तसेच पोवाडा, शिववंदना सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमासाठी अमोल पाटील, स्वाती निकम, गोकर्णा भोंडे यांनी पुढाकार घेतला. तसेच कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक तानाजी पाटील, कर्मचारी विजया परतेकर, ज्ञानेश्वर सोनवणे आदींनी परिश्रम घेतले.

\"स्नेहसंमेलन\"

Previous Post

लोहाऱ्यात शरद युवा संवाद यात्रेचे उत्साहात स्वागत – पक्षाचे विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवून पक्ष बळकट करा – युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख

Next Post

विलासपुर पांढरी येथील विविध विकासकामांचे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

Related Posts

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

लोहारा तालुका

लोहारा येथे महात्मा बसवेश्वर मंदिर जीर्णोद्धार निमित्त विधिवत पुजा आणि संकल्प

Next Post

विलासपुर पांढरी येथील विविध विकासकामांचे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!