Wednesday, September 30, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

लोहारा शहरातील प्रभाग 6 मध्ये विकासकामाचे उद्घाटन

by admin
in लोहारा तालुका
A A
0

लोहारा शहरातील प्रभाग सहा मध्ये विकास कामाचे उद्घाटन करण्यात आले आहे. यामुळे प्रभागातील नागरिकांची अडचण दूर होणार आहे.
लोहारा शहरातील प्रभाग क्र. ६ मध्ये मागील काही वर्षापासुन कोकणे ते फुटाणकर यांच्या घरासमोर गटारीचे काम अर्धवट राहिल्यामुळे गटारीचे पाणी तुंबल्यामुळे नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला होता. डासांचे प्रमाण वाढल्यामुळे रोगराईचे प्रमाण वाढण्याचा धोका निर्माण झाला होता. या गटारीत पाणी साचुन राहिल्यामुळे पावसाळ्यात काही घरामध्ये पाणी घुसत होते. या अडचणी लक्षात घेऊन प्रभाग सहाच्या नगरसेविका मयुरी अमोल बिराजदार यांच्या प्रयत्नातुन जिल्हा नियोजनच्या माध्यमातुन या गटारीसाठी निधी मंजुर करुन घेण्यात आला. या कामाचे उद्धघाटन सामाजिक कार्यकर्ते प्रकाश भगत, रघुविर घोडके, बक्षु फुटाणकर यासह प्रभागातील नागरीकांच्या हस्ते करण्यात आले. यामुळे पावसाळ्यातील येणारी अडचण दुर होणार आहे. तसेच प्रभागातील काही घरामध्ये पाणी शिरत होते. तीही अडचण दुर होईल.

\"लोहारा\"
यावेळी युवासेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश भगत, वि.का.से.सो.चे माजी सदस्य रघुविर घोडके, नागराळचे शाखाप्रमुख पिंटु गोरे, बक्षु फुटाणकर, राजु स्वामी, अंकुश नारायणकर, गणेश रणशुर, बब्बु रणशुर, विष्णु कोकणे, मल्लिनाथ स्वामी, पंडीत निर्मळे, दगडु निर्मळे, चाऊस, आकाश निर्मळे, आकाश स्वामी यासह महिला व नागरीक उपस्थिती होते.

\"लोहारा\" \"\"

Tags: लोहारा
Previous Post

लोहारा तालुक्यातील बेंडकाळ येथे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या उपस्थितीत विविध विकासमाकांचे लोकार्पण

Next Post

लोहारा तालुक्यातील कास्ती (खु) ग्रामपंचायतकडून दोनशे कुटुंबांना कचराकुंडीचे वाटप

Related Posts

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

लोहारा तालुका

लोहारा येथे महात्मा बसवेश्वर मंदिर जीर्णोद्धार निमित्त विधिवत पुजा आणि संकल्प

Next Post

लोहारा तालुक्यातील कास्ती (खु) ग्रामपंचायतकडून दोनशे कुटुंबांना कचराकुंडीचे वाटप

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!