Friday, October 2, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

गोगलगायच्या नियंत्रणासाठी कृषी विभागासोबतच कृषी सेवा केंद्रांनीही सहभाग वाढवावा – जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांचे आवाहन

by admin
in आपला जिल्हा, कृषी
A A
0

गतवर्षीच्या खरीप हंगामातील पिकांवर गोगलगायसह पिवळा हळद्या रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे यावर्षी त्यावर नियंत्रण करण्यासाठी कृषी विभागाने गावोगावी जाऊन गाव बैठका व मिळावे घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली आहे. परंतू यामध्ये कृषी सेवा केंद्रांनी देखील एक पाऊल पुढे येऊन गोगलगाय नियंत्रण करण्यासाठी त्यांचा मोलाचे योगदान देणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे त्यांनी त्यांच्याकडे निविष्ठा खरेदीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना गोगलगाय नियंत्रण संदर्भात सविस्तर मार्गदर्शन करण्यासह त्यांच्या कृषी सेवा केंद्रामध्ये दर्शनी भागामध्ये कृषी विभागाने गोगलगाय नियंत्रण संदर्भात केलेले पोस्टर लावावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी केले आहे.
गुरुवारी (दि.१८) उमरगा व लोहारा तालुक्याची हराळी येथील ज्ञान प्रबोधिनी येथे तर तुळजापूर व उस्मानाबाद तालुक्यातील कृषी सेवा केंद्र चालक यांची खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठक तुळजापूर येथील टाटा सामाजिक विज्ञान केंद्रामध्ये घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.

\"गोगलगाय\"
यावेळी तालुका कृषी अधिकारी यांच्यासह जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक चेतन जाधव आदी उपस्थित होते. पुढे बोलताना जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी माने म्हणाले की, उन्हाळ्यात खोल नांगरट करून घेतल्यामुळे जमिनीच्या खालच्या थरात लपलेल्या गोगलगायी वरील थरात येऊन कडक उन्हामुळे नष्ट होतात. तर सोयाबीनच्या पेरणीनंतर पूर्ण शेताभोवती (बांधाच्या आतल्या बाजूने) ५ सेमी रुंदीचा चुन्याचा पट्टा ओढून घ्यावा. तसेच सोयाबीनच्या पेरणीनंतर लगेच बांधाच्या आतल्या साईडने मेटाल्डीहाईड ३.५ टक्के (स्नेलकिल) या औषधांच्या पेलेटला कट करून बारीक गोळ्यात रुपांतर करावे व संपूर्ण शेताच्या भोवती (बांधाच्या आतल्या साईडने) ५ ते ७ फुट अंतरावर एक गोळी टाकावी. विशेष म्हणजे बांधा व्यतिरिक्त आत शेतामध्ये गोगलगायींचा प्रादुर्भाव झाला असेल तर प्रत्येक ४ ओळीनंतर ओळीच्या बाजूने ६ फुट अंतरावर स्नेलकिल औषधाच्या गोळ्या टाकाव्यात. तर रात्रीच्या वेळी शेतात गवताचे ढीग किंवा सुतळी बारदाना पाण्यात भिजवून प्रती एकरी १० ठिकाणी ठेवावा.

\"कृषी

तसेच सकाळी ६ ते ८ च्या दरम्यान ढिगाखाली किंवा बारदान्याखाली जमा झालेल्या गोगलगायी गोळा करून साबणाच्या अथवा मिठाच्या पाण्यात टाकून नष्ट कराव्यात असे सांगत गोगलगाय नियंत्रणासाठी एकात्मिक व सामुहिक मोहीम राबवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी व तालुक्यातील कृषी सेवा केंद्र चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: कृषी विभागगोगलगाय
Previous Post

गाळमुक्त धरण – गाळयुक्त शिवार योजना पुन्हा सुरु ; धरणातील गाळ उपसा करण्यासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

Next Post

लोहारा शहरात सामुदायिक विवाह सोहळा संपन्न – लोहारा येथील क्लासिक डेव्हलपर्स यांच्याकडून आयोजन

Related Posts

आपला जिल्हा

पोहनेर येथे ‘जीवन ज्योत महिला ग्राम संघा’ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

आपला जिल्हा

भूम येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न; अभियानातून ४ हजार ४५९ लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ

आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

Next Post

लोहारा शहरात सामुदायिक विवाह सोहळा संपन्न - लोहारा येथील क्लासिक डेव्हलपर्स यांच्याकडून आयोजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!