Thursday, October 1, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

निवासी दिव्यांग शाळेत राष्ट्रवादी दिव्यांग सेलचे लोहारा तालुकाध्यक्ष लक्ष्मण बिराजदार व जिल्हा उपाध्यक्ष शौकतअली मासुलदार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

by admin
in लोहारा तालुका
A A
0

लोहारा तालुक्यातील सास्तूर येथील निवासी दिव्यांग शाळेत राष्ट्रवादी दिव्यांग सेलचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण बिराजदार व जिल्हा उपाध्यक्ष शौकतअली मासुलदार यांचा वाढदिवस प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास प्रक्रियेत मदतीचा हात देवून, खाऊ वाटप करून विद्यार्थ्यांमध्ये केक कापून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
वाढदिवसानिमित्त आयोजीत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक बी.टी.नादरगे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून व्यकंट राजपूत जि.प.प्रा.शा.अध्यक्ष शालेय समिती तावशीगड, निरंजन कुलकर्णी अभियंता, श्रीमंत गरड, किशोर बिराजदार, बाजीराव पाटील, महमद अत्तार तालुकाध्यक्ष, लोहारा बालाजी सुर्यवंशी इ. उपस्थित होते. उपस्थितीतांचे प्रशालेच्या वतीने पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.त्यानंतर लक्ष्मण बिराजदार व शौकतअली मासुलदार यांचे वाढदिवसानिमित्त यथोचित सत्कार करून व त्यांचे हस्ते केक कापून

\"राष्ट्रवादी\"

वाढदिवसाचे अभिष्टचिंतन करून त्यांना उदंड आयुष्य लाभो.सुख समाधान व चांगले आरोग्य मिळावे यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. प्रशालेचे मुख्याध्यापक यांनी प्रास्ताविक मनोगत व्यक्त करताना म्हणाले की या दोन्ही मान्यवरांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आमच्या प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास प्रक्रियेत मदतीचा हात देवून या दिव्यांग विद्यार्थ्यांमध्ये वाढदिवस साजरा करण्याच्या उपक्रमाचं त्यांच्या सर्व तरुण मित्रांचे कौतुक करून सर्वांचे अभिनंदन केले.या सर्वांचा आदर्श घेवून समाजातील दायीत्वाची भावना असणाऱ्या व्यक्तींनी या वंचितांच्या मदतीला पुढे आले पाहिजे. या अतिशय स्तुत्य उपक्रमाबाबत सर्वांचे आभार मानले.यावेळी प्रशालेतील कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

\"राष्ट्रवादी\"

Tags: राष्ट्रवादी काँग्रेसवाढदिवस
Previous Post

लोहारा, उमरगा तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा – स्वराज्य संघटनेची निवेदनाद्वारे मागणी

Next Post

पार्वती मल्टीस्टेटमध्ये नूतन सल्लागारांच्या निवडी

Related Posts

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

लोहारा तालुका

लोहारा येथे महात्मा बसवेश्वर मंदिर जीर्णोद्धार निमित्त विधिवत पुजा आणि संकल्प

Next Post

पार्वती मल्टीस्टेटमध्ये नूतन सल्लागारांच्या निवडी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!