लोहारा शहरातील पार्वती मल्टीस्टेट को – ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड शाखा लोहारा येथे नवीन सल्लागारांच्या निवडी करून त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
पार्वती मल्टीस्टेटचे संस्थापक अध्यक्ष आबासाहेब साळुंके, संचालक कल्लेश्वर जाधव, सिंदफळे दिलीप यांच्या लक्षात येता संस्थेच्या आर्थिक उन्नती मध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल संस्थेच्या मासिक ठराव मध्ये सल्लागार या पदावर नेमणूक करण्यात आली. शुक्रवारी (दि.१४) संस्थेचे अध्यक्ष आबासाहेब साळुंके, संचालक कल्लेश्वर जाधव, सिंदफळे दिलीप यांच्या हस्ते कदम राजेंद्र, कोळी हणमंत, वाळके पुंडलिक, गिरिश भगत, सतीश बाबर, मोहनसिंग राजपूत आदींना प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ देवून सल्लागार पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी बॅंकेचे सहाय्यक शाखा व्यवस्थापक मनोज देशपांडे, महेश रवळे, संदीप गोरे आदींची उपस्थिती होती.