Thursday, October 1, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

लोहारा तालुक्यातील मोघा खुर्द येथील शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी नंदकुमार गरगडे तर उपाध्यक्षपदी अंगद भोंडवे

by मुख्य संपादक
in लोहारा तालुका
A A
0

तालुक्यातील मोघा खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी नंदकुमार गरगडे तर उपाध्यक्षपदी अंगद भोंडवे यांची निवड करण्यात आली आहे.
लोहारा तालुक्यातील मोघा खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पालक मेळावा घेण्यात आला. यावेळी नुतन शाळा व्यवस्थापन समितीची निवड माजी अध्यक्ष मोहन गोरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती सदस्यपदी सारीका हिरवे, समिना मुजावर, सुनिता मत्ते, सविता दळवे, सुरेखा भोंडवे, शिवहरी दळवे, मारूती भोंडवे, मोहन गोरे, शिक्षक प्रतिनिधी उषा बर्डे, विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून अंकिता भोंडवे, ज्ञानेश्वरी भोंडवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यानंतर अध्यक्षपदी सर्वांनुमते नंदकुमार गरगडे व उपाध्यक्षपदी अंगद भोंडवे यांची निवड करून सत्कार करण्यात आला.

\"\"
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक विकास घोडके, सहशिक्षिका उषा बर्डे, अंजली गरगडे, कालींदा मत्ते, रोहीणी पाटील, जगन्नाथ भोंडवे, विनायक गरगडे, गंगाराम भोंडवे, लक्ष्मण भोंडवे, रामचंद्र मत्ते, विनायक दळवे, हमीद मुजावर, चॉंद मुजावर, बाबुलाल मुजावर, भरत मत्ते, दयानंद सोनटक्के, प्रशांत गोरे यांच्यासह पालक, नागरीक, विद्यार्थी उपस्थित होते. निवडीनंतर मुख्याध्यापक विकास घोडके यांनी शाळेला सहकार्यासाठी सर्वांना अवाहन केले. यावेळी सर्वांनी मिळून शाळा सुधारणेसाठी एकत्रित प्रयत्न करू. समाज, गाव सहभागातून, लोकसहभागातून शाळेला सहकार्य करु असे बैठकीत ठरले.सर्व निवडी खेळीमेळीच्या वातावरणात सर्वानुमते बिनविरोध पार पडल्या.

\"\"

\"\"

Tags: लोहारा तालुकाशाळा व्यवस्थापन समिती
Previous Post

मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठीचा सर्वेक्षणाचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुपूर्द – इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण मराठा समाजाला मिळेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास

Next Post

लोहारा शहरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

Related Posts

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

लोहारा तालुका

लोहारा येथे महात्मा बसवेश्वर मंदिर जीर्णोद्धार निमित्त विधिवत पुजा आणि संकल्प

Next Post

लोहारा शहरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!