Wednesday, September 30, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रेनिमित्त ४ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

by मुख्य संपादक
in लोहारा तालुका
A A
0

लोहारा शहरातील महाशिवरात्री (mahashivaratri) यात्रा महोत्सव दि. ८ ते ११ मार्च या कालावधीत होणार असून यात्रा महोत्सवाचे हे २४ वे वर्ष आहे. यात्रा महोत्सवात सलग ४ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
महाशिवरात्रीच्या दिवशी शुक्रवारी (दि. ८ मार्च) या महोत्सवाची सुरुवात होणार आहे. या दिवशी शुक्रवारी (दि. ८) शोभायात्रा होणार आहे. सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात आगमन होताच महादेवाची आरती होईल. त्यानंतर ही शोभायात्रा जुन्या गावातील प्राचीन महादेव (mahadev) मंदिरापर्यंत काढण्यात येणार आहे. दुपारी १२ वाजता भारुडाचा कार्यक्रम होणार आहे. या दिवशी सायंकाळी सहा वाजता दिपोत्सव (महिलांसाठी ) होणार आहे. दुसऱ्या दिवशी शनिवारी (दि.९) सकाळी आठ वाजता शिवस्तोत्र पठण स्पर्धा होणार आहे. त्यानंतर ११.३० वाजता शिवभक्त संगमेश्वर बिराजदार महाराज वलांडीकर यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल. दुपारी ४ वाजता भव्य खुल्या जंगी कुस्त्यांचा फड रंगणार आहे. शेवटची कुस्ती विजेत्या मल्लास ३५ तोळे चांदीची महादेवाची पिंड शिवशंकर जट्टे कुटुंबियांच्या वतीने देण्यात येणार आहे. उपविजेत्यास लोहारा खुर्द येथील नरहरी सुग्रीव रसाळ यांच्या वतीने रु. ५०००/- व स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे.

\"महाशिवरात्री\"
तिसऱ्या दिवशी रविवारी (दि.१०) सकाळी ७ वाजता मॅरेथॉन स्पर्धा होणार आहे. सकाळी १० वाजता महादेव मंदिरात महिलांसाठी खुल्या रांगोळी स्पर्धा होणार आहे. रात्री ७ वाजता भव्य जंगी भारुडाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. चौथ्या दिवशी सोमवारी (दि. ११) सायंकाळी ७ वाजता भव्य खुल्या राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा होणार आहे. या सर्व कार्यक्रम व स्पर्धांचा परिसरातील भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा कमिटी व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

\"\"

Tags: महाशिवरात्रीयात्रा महोत्सव लोहारा
Previous Post

लोहारा येथील दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालत संपन्न

Next Post

मुख्यमंत्री सुंदर शाळा अभियानाचा निकाल जाहीर; लोहारा तालुक्यातून बेलवाडी शाळेचा प्रथम क्रमांक

Related Posts

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

लोहारा तालुका

लोहारा येथे महात्मा बसवेश्वर मंदिर जीर्णोद्धार निमित्त विधिवत पुजा आणि संकल्प

Next Post

मुख्यमंत्री सुंदर शाळा अभियानाचा निकाल जाहीर; लोहारा तालुक्यातून बेलवाडी शाळेचा प्रथम क्रमांक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!