Wednesday, September 30, 2026
No Result
View All Result
No Result
View All Result
  • Home

लोहारा येथील दिवाणी न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालत संपन्न

by मुख्य संपादक
in लोहारा तालुका
A A
0

तालुका विधी सेवा समिती लोहारा (Lohara) व विधिज्ञ मंडळ लोहारा यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाणी न्यायालय (court) लोहारा येथे रविवारी ( दि. ३) राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते.
दिवाणी न्यायाधीश एस. एस. कळसकर यांच्या अध्यक्षतेखाली ही राष्ट्रीय लोकअदालत घेण्यात आली. यावेळी सह दिवाणी न्यायाधीश पी. एस. बनकर उपस्थित होते. या लोकअदालतीमध्ये २५ दिवाणी प्रकरणे व ४१ फौजदारी प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यामध्ये एका नियमित दिवाणी प्रकरणामध्ये ५० हजार रुपये तडजोड रक्कम वसूल झाली. वादपूर्व प्रकरणामध्ये ग्रामपंचायत कर वसुली प्रकरणामध्ये एकूण २६,८२,८८७ रुपये वसूल झाले. भारतीय स्टेट बँक – वादपूर्व प्रकरणामध्ये ७,२४,००० रुपये रक्कम वसुल झाली. महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा लोहारा वादपूर्ण प्रकरणामध्ये २,१०,२१० रुपये वसुल झाले. तर नगर पंचायत लोहारा वादपूर्व प्रकरणामध्ये १२,४०,७९० रुपये वसुल झाले.
फौजदारी प्रकरणामध्ये ५८०० रुपये दंड वसुल झाला. या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये विधीज्ञ डी. बी. जाधव, दादासाहेब पाटील, एस. एन. बादुले, ए. ए. कुलकर्णी, डी.एस. जानकर, एम. यू. जट्टे, आर बी. जाधव, टी. एस. मोरे, बी. के. भुजबळ, एस. जी. पनूरे एम. एस. वचणे, एस आर. अडसूळे, डी. एम. जाधव, एम. डी. घवाळे, व्ही. व्ही. गुंड यांच्यासह इतर विधीज्ञ, सर्व न्यायालय कर्मचारी, पक्षकार उपस्थित होते.

\"\"

Tags: राष्ट्रीय लोक अदालत
Previous Post

जोपर्यंत ओबीसींमधून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आगामी निवडणुकीवर बहिष्कार; होळी ग्रामस्थांचा बैठकीत निर्णय

Next Post

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रेनिमित्त ४ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

Related Posts

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

लोहारा तालुका

लोहारा येथे महात्मा बसवेश्वर मंदिर जीर्णोद्धार निमित्त विधिवत पुजा आणि संकल्प

Next Post

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रेनिमित्त ४ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!