Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

स्वराज्यच्या वतीने तहसिल कार्यालयासमोर सुरू असलेले उपोषण आश्वासनानंतर तात्पुरते मागे

मुख्य संपादक by मुख्य संपादक
31/05/2024
in लोहारा तालुका
A A
0
स्वराज्यच्या वतीने तहसिल कार्यालयासमोर सुरू असलेले उपोषण आश्वासनानंतर तात्पुरते मागे
Ad 10

लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील साठवण तलावात पवनचक्की कंपनीने उभे केलेले विद्युत पोल काढून टाकण्यात यावेत या मागणीसाठी स्वराज्य संघटनेच्या वतीने तहसिल कार्यालयासमोर सोमवारी (दि.२७) हे उपोषण सुरू झाले होते. तिसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी (दि.२९) हे उपोषण मागे घेण्यात आले.
लोहारा तालुक्यात टोरंट व सिमेंस गमेसा या पवनचक्की कंपनीने तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथे आपले पवनचक्कीचे प्रकल्प २०१९ मध्ये उभा केले असून या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या शेकडो एकर जमिनी संपादित केल्या आहेत. जमिनी संपादित करत असताना ज्या ठिकाणी शेतकरी जमीन देण्यासाठी तयार होत नाही अशा ठिकाणी हुकुमशाही पद्धतीने जमिनीचा ताबा घेऊन आपले विद्युत पोल रोवले आहेत. तसेच शासनाच्या साठवण तलावासाठी संपादित झालेल्या जमिनीवर व ज्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह असतो अशा ठिकाणी उच्च दाब असलेले विद्युत लाईन उभा केले आहेत. वन्यजीव व शेतकऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा पद्धतीने उभा केलेल्या विद्युत पोल काढून टाकण्यात यावे यासाठी स्वराज्य पक्षाच्या वतीने लोहारा तहसील कार्यालयासमोर सोमवार (दि. २७) पासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते. जोपर्यंत साठवण तलावातील पोल काढून टाकले जात नाहीत व शेतकऱ्यांच्या शेतातील पोल बाबत योग्य ती कारवाई होत नाही तोपर्यंत सदरचे आमरण उपोषण सुरू ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हा कार्यकारणी सदस्य महेश गोरे यांनी सांगितले होते. यावेळी उपोषणास बालाजी मुळे, महेश सुतार, शिवाजी लकडे, राजाभाऊ मुळे, दत्ता मुळे, अंकुश सुतार आदी उपस्थित होते.
याबाबत उपविभागीय पाटबंधारे विभाग देखील कुठलीच कार्यवाही करताना दिसत नाही गेल्या पाच वर्षापासून शेतकरी अर्ज देऊन देखील उपविभागीय पाटबंधारे विभाग शाखा क्रमांक आठ यांनी देखील कुठलीही कार्यवाही आजपर्यंत केली नसल्यामुळे १५ मे रोजी जलसमाधी आंदोलन देखील करण्यात आले होते. त्यानंतर कंपनीने २४ मेपर्यंत पोल काढून टाकण्यासाठी वेळ मागून घेतला होता. मात्र त्यानंतरही कारवाई न झाल्यामुळे स्वराज्यच्या वतीने आमरण उपोषणाचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार हे उपोषण करण्यात येत होते. मंगळवारी (दि.२८) उपोषणाचा दुसरा दिवस होता. पहिल्या दिवशी व मंगळवारी दुपारपर्यंत कोणीही अधिकारी उपोषण स्थळी आला नसल्याचे स्वराज्यचे महेश गोरे यांनी सांगितले. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी (दि.२९) रात्री आठ वाजता पोलीस निरीक्षक अजित चिंतले, पाटबंधारे विभागाचे श्रीकांत कदम, पवनचक्की कंपनीचे अधिकारी यांच्या उपस्थितीत हे उपोषण सोडण्यात आले. दि. ७ जून रोजी सर्व विभागाचे अधिकारी, पवनचक्की कंपनीचे अधिकारी, स्वराज्यचे प्रतिनिधी व शेतकरी यांच्या उपस्थितीत लोहारा पोलीस ठाण्यात बैठक घेण्यात येईल. या बैठकीत सर्व विषयांवर चर्चा होऊन योग्य तो मार्ग काढला जाईल असे आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण तात्पुरते सोडण्यात आल्याचे महेश गोरे यांनी सांगितले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: पवनचक्कीलोहारास्वराज्य
Previous Post

प्रजाहितदक्ष : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर

Next Post

जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपासाठी बँकांनी गावनिहाय शिबिरांचे आयोजन करावे – जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post
जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपासाठी बँकांनी गावनिहाय शिबिरांचे आयोजन करावे – जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे

जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपासाठी बँकांनी गावनिहाय शिबिरांचे आयोजन करावे - जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's