Vartadoot
Saturday, August 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपासाठी बँकांनी गावनिहाय शिबिरांचे आयोजन करावे – जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे

खरीप हंगाम 2024 च्या पीक कर्ज वाटपाचा आढावा

मुख्य संपादक by मुख्य संपादक
31/05/2024
in आपला जिल्हा, कृषी
A A
0
जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपासाठी बँकांनी गावनिहाय शिबिरांचे आयोजन करावे – जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे
Ad 10

धाराशिव दि.30 (जिमाका) यावर्षी चांगला पाऊस (rain) अपेक्षित आहे. बँकांनी पीक कर्ज (crop loan) वाटपाची गती वाढवावी. जिल्ह्यात पीक कर्ज वाटपाचे प्रमाण कमी आहे.जिल्ह्यातील कोणताही शेतकरी हा खरीप पिक कर्जापासून वंचित राहणार नाही याची दक्षता सर्व बँकांनी घ्यावी.जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यासाठी बँकांनी गावनिहाय शिबिराचे आयोजन करून शेतकऱ्यांकडून कागदपत्राची पूर्तता करावी.असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी दिले.

30 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात खरीप हंगाम – 2024 च्या पीक कर्ज वाटपाचा आढावा घेताना डॉ.ओंबासे बोलत होते.यावेळी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक चिन्मय दास, प्रभारी जिल्हा उपनिबंधक बालाजी काळे व बँकांचे जिल्हा समन्वयक यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ.ओंबासे म्हणाले,सर्व बँक व्यवस्थापकांनी गावनिहाय पीक कर्जाबाबत शिबिराच्या आयोजनाची तारीख निश्चित करावी.पीक कर्जासाठी कोणकोणते कागदपत्रे लागतात त्याची पूर्तता शेतकऱ्यांकडून करून घ्यावी.त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागणार नाही.बँकांनी पीक कर्ज वाटपाचे जे उद्दिष्ट दिले आहे ते पूर्ण करावे.येत्या आठ ते दहा दिवसात गावनिहाय पिक कर्ज वाटपाचे शिबिरे आयोजित करावी.शिबिराच्या आयोजनाची पूर्वकल्पना बँकांनी त्यांच्या नोटीस बोर्डवर लावावी.तसेच बँकांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या गावातील शेतकऱ्यांच्या व्हाट्सअप ग्रुपवर शिबीराच्या आयोजनाची माहिती पाठवावी.म्हणजे त्यांच्या माध्यमातून गावनिहाय आयोजित करण्यात येणाऱ्या शिबिराची माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळण्यास मदत होणार आहे.त्यामुळे शेतकरी हे गाव पातळीवर आयोजित करण्यात येणाऱ्या शिबिरामध्ये सहभागी होऊन पिक कर्ज वाटपाचा लाभ घेऊ शकतील असे ते म्हणाले.

बँकांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून पीक कर्ज वाटपाच्या दृष्टीने कारवाई करावी असे सांगून डॉ.ओंबासे म्हणाले, बँकांनी पीक कर्ज वाटपात प्रगती करून वेळेतच शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे नियोजन करावे.बँकांनी पीक कर्ज वाटपाचा दैनंदिन अहवाल जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकांकडे सादर करावा. असे डॉ.ओंबासे यावेळी म्हणाले.

सन 2024- 25 या वर्षाच्या खरीप हंगामात बँकांना 1583 कोटी 77 लक्ष रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.जिल्ह्यातील 41 हजार 526 शेतकऱ्यांना 28 मे 2024 पर्यंत 313 कोटी 60 लक्ष रुपये खरीप पिक कर्ज वाटप केले असून पीक कर्ज वाटपाची टक्केवारी 19.80 इतकी असल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँक प्रबंधक श्री.दास यांनी यावेळी दिली.

या बैठकीला जिल्हातील सर्व बँकांचे जिल्हा समन्वयक आणि सर्व बँकांचे शाखा व्यवस्थापक ऑनलाईन पद्धतीने सहभागी होते.संबंधित बँकांचे जिल्हा व्यवस्थापक आणि शाखा व्यवस्थापक यांनी त्यांच्या बँक आणि शाखांकडून आतापर्यंत या खरीप हंगामात केलेल्या पीक कर्ज वाटपाची माहिती यावेळी दिली.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: जिल्हाधिकारी सचिन ओंबासेधाराशिवपीक कर्ज वाटप
Previous Post

स्वराज्यच्या वतीने तहसिल कार्यालयासमोर सुरू असलेले उपोषण आश्वासनानंतर तात्पुरते मागे

Next Post

लोहारा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

Related Posts

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन
आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

28/07/2026
गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन
आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

27/07/2026
उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

23/07/2026
तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी
उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

23/07/2026
अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन
आपला जिल्हा

अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन

22/07/2026
उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन
उमरगा तालुका

उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन

22/07/2026
Next Post
लोहारा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

लोहारा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's