लोहारा तालुक्यातील मार्डी येथून तोरंबा गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात आली. लोहारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित चिंतले यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.५) ही वृक्ष लागवड करण्यात आली.
वृक्ष लागवड ही काळाची गरज आहे. मागील वर्षीच्या उन्हाळ्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. पर्जन्यमान कमी झाले आहे. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड आवश्यक आहे. त्यामुळे सामाजिक भावना जोपासत शुक्रवारी (दि.५) तालुक्यातील मार्डी येथे ही वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक अजित चिंतले यांच्या हस्ते या वृक्ष लागवडीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जवळपास सिसमचे दोनशे झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले. मार्डी येथून तोरंबा गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुतर्फा ही वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी लोहारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित चिंतले, पोलीस उपनिरीक्षक सचिन केंद्रे, पोलीस नाईक आनंतकुमार देवकर, विठ्ठल ढवण, ग्रामपंचायत सदस्य योगेश देवकर, व्यंकट वाकळे, सुनिल मोरे, काजळे मॅडम व ग्रामसेवक गाडेकर, डाटा ऑपरेटर अण्णासाहेब देवकर व ग्रामस्थ उपस्थित होते.