Saturday, October 31, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

ध्येय निश्चित करून करिअरची वाटचाल करावी – प्रा. एन. जी. गायकवाड

by मुख्य संपादक
in लोहारा तालुका
A A
0

लोहारा शहरातील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात ११ वी व वरिष्ठ महाविद्यालयातील नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी देवगिरी महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथील उपप्राचार्य प्रा. एन. जी. गायकवाड, इंग्रजी विभागातील तज्ञ प्रा. शेख साबिहा, पदार्थ विज्ञान विभागातील तज्ज्ञ प्रा. डॉ. किरण पतंगे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. आर. घोलकर, उपप्राचार्य प्रा. अभिजीत सपाटे, बाबू हेड्डे यांची उपस्थिती होती. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये इ. ११ वी मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांच्या स्वागतप्रसंगी बोलताना प्रा. एन. जी. गायकवाड म्हणाले की, \’विद्यार्थ्यांनी करिअर निवडताना आपल्या आवडीचे क्षेत्र निवडावे. जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर ग्रामीण भागातूनसुद्धा विद्यार्थी मेडिकल आणि इंजिनिअरिंगसारख्या महाविद्यालयात प्रवेश मिळवत आहेत. तसेच जीवनामध्ये ध्येय निश्चित करून करिअरची वाटचाल करावी, मोबाइलपासून विद्यार्थ्यांनी दूर राहावे, योग्य गोष्टीसाठीच मोबाईलचा वापर करावा\’ असा सल्ला उपप्राचार्य प्रा. एन. जी. गायकवाड यांनी यावेळी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना दिला. प्रा. शेख साबिहा यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज साधताना माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नोकरी मिळविण्यासाठी आता शाखेचे बंधन नाही, कला आणि वाणिज्य शाखेतील विद्यार्थीसुद्धा आय. टी. क्षेत्रात चांगल्या पगाराची नोकरी मिळवू शकतात अशी माहिती उपस्थितांना दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. आर. घोलकर यांनी सर्व प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत करताना संस्थेचे सरचिटणीस आ. सतीश चव्हाण यांची आगामी काळातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असणाऱ्या ध्येय धोरणाविषयी माहिती दिली. तसेच संस्थेचे देवताळा या ठिकाणी सुरु असणाऱ्या क्रांतिवीर दत्तोबा भोसले डिफेन्स अकॅडेमी विषयी उपस्थित विद्यार्थ्यांना माहिती दिली. पोलीस भरतीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांचे प्रशिक्षक अमरसिंह टेकाळे यांचा यावेळी सत्कार केला. उपप्राचार्य प्रा. अभिजित सपाटे यांनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा सर्वांसमोर ठेवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. प्रशांत माने यांनी केले. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी प्रा. व्यंकट घोडके, गणेश गरड, दादा साठे यांनी विशेष मेहनत घेतली. प्रा. व्ही. डी. तुंगे यांनी आभार मानले.

Ad 2
Ad 1
Tags: भानुदासराव चव्हाण महाविद्यालयलोहारा
Previous Post

लोहारा शहरातील वसंतदादा पाटील हायस्कुल व नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयातील गुणवंतांचा सत्कार

Next Post

महिलांना अर्ज भरण्यासाठी मदत करून जास्तीत जास्त महिलांना योजनेसाठी प्रोत्साहित करा – जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे

Related Posts

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

Next Post

महिलांना अर्ज भरण्यासाठी मदत करून जास्तीत जास्त महिलांना योजनेसाठी प्रोत्साहित करा - जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!