Vartadoot
Saturday, July 25, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

महिलांना अर्ज भरण्यासाठी मदत करून जास्तीत जास्त महिलांना योजनेसाठी प्रोत्साहित करा – जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे

मुख्य संपादक by मुख्य संपादक
15/07/2024
in आपला जिल्हा
A A
0
महिलांना अर्ज भरण्यासाठी मदत करून जास्तीत जास्त महिलांना योजनेसाठी प्रोत्साहित करा – जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे
Ad 10

धाराशिव दि.15 (जिमाका) मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण ही राज्य सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे.ग्रामीण व शहरी भागातील या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या महिलांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी यंत्रणाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अर्ज भरण्यास महिलांना मदत करून जिल्ह्यातील कोणतीही पात्र महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेऊन जास्तीत जास्त महिलांना योजनेच्या लाभासाठी प्रोत्साहित करा.असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांनी दिले.

आज 15 जुलै रोजी जिल्हाधिकारी कक्षातून व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेचा तालुकास्तरीय यंत्रणांकडून आढावा घेताना डॉ.ओंबासे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव,उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.गिरी व श्री.गोडभरले, उपजिल्हाधिकारी श्रीमती गायकवाड व नगरपालिका प्रशासनाचे सहाय्यक तहसील जाधवर यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ.ओंबासे म्हणाले, जास्तीत जास्त महिला लाभार्थ्यांपर्यंत यंत्रणाचे अधिकारी कर्मचारी यांनी पोहोचून त्यांना अर्ज वितरित करावे. शहरी भागात हे काम वेगाने करावे. लाभार्थ्यांनी अर्ज भरले व पात्र ठरले त्या लाभार्थ्यांच्या याद्या प्रकाशित कराव्यात.त्यामुळे लाभार्थी अर्ज भरण्यासाठी मोठ्या संख्येने पुढे येतील.किती कर्मचाऱ्यांनी किती अर्ज संकलित केले याची माहिती ठेवावी. बचत गटाच्या माध्यमातून जास्तीत जास्त महिलांना अर्ज भरण्यासाठी प्रोत्साहित करावे.शहरी भागात अर्जाला तपासून पात्र ठरविण्याचे अधिकार मुख्याधिकारी यांना तर ग्रामीण भागात गटविकास अधिकारी यांना आहे.शहरी भागात या योजनेसाठी एक नोडल अधिकारी नियुक्त करावा. त्यांच्याकडून दैनंदिन अहवाल मागवावा असे त्यांनी सांगितले.

लाभार्थ्यांच्या पात्र याद्या बघून त्यांना मंजुरी देऊन त्या प्रकाशित कराव्या असे सांगून डॉ.ओंबासे म्हणाले, ऑनलाइन भरलेले अर्जसुद्धा तपासून मंजूर करावे. या कामी विविध विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सेवा घ्याव्या.ग्रामीण भागातील महिला लाभार्थ्यांना जास्तीत जास्त लाभ देण्याच्या दृष्टीने त्यांचे अर्ज भरून घेऊन अर्जाची छाननी करावी.या कामासाठी गटविकास अधिकाऱ्यांनी इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सेवा अधिग्रहित कराव्यात. सर्वांनी या योजनेसाठी प्राधान्याने काम करावे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण) यांनी नेमलेल्या नोडल अधिकाऱ्यांचा दररोज आढावा घ्यावा. कोणत्या कर्मचाऱ्यांनी शहरी भागात अर्ज जमा केले याची नोंद घ्यावी. म्हणजे त्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देता येईल असे डॉ.ओंबासे म्हणाले.

डॉ.घोष म्हणाले,ग्रामीण भागातील योजनेच्या लाभासाठी पात्र असलेली एकही महिला योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही यासाठी गावपातळीवर यंत्रणांनी सूक्ष्म नियोजनातून काम करावे.अंगणवाडी सेविकांनी किती अर्ज भरून घेतले याची नोंद घ्यावी. असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून तालुकास्तरीय यंत्रणांनी आणि शहरी भागासाठी काम करणाऱ्या नगरपालिका प्रशासनाने योजनेसाठी किती महिलांनी अर्ज केले,किती महिलांचे अर्ज प्राप्त झाले आणि किती अर्ज पात्र ठरले तसेच योजनेसाठी करण्यात येत असलेल्या कामाची माहिती दिली.यावेळी तहसीलदार,गटविकास अधिकारी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी व बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी ही माहिती दिली.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: माझी लाडकी बहीण
Previous Post

ध्येय निश्चित करून करिअरची वाटचाल करावी – प्रा. एन. जी. गायकवाड

Next Post

उंडरगाव ते तोरंबा पाटी रस्त्याची दुरावस्था; लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन रस्त्याचे काम मार्गी लावण्याची ग्रामस्थांची मागणी

Related Posts

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

23/07/2026
तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी
उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

23/07/2026
अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन
आपला जिल्हा

अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन

22/07/2026
उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन
उमरगा तालुका

उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन

22/07/2026
मोबाईलचा अचानकपणे स्फोट होऊन एक तरुण किरकोळ जखमी; तरुणाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला
आपला जिल्हा

मोबाईलचा अचानकपणे स्फोट होऊन एक तरुण किरकोळ जखमी; तरुणाच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला

19/07/2026
लोहारा येथे जिल्हाधिकारी यांनी केली एसआयआर मोहिमेची पाहणी
आपला जिल्हा

लोहारा येथे जिल्हाधिकारी यांनी केली एसआयआर मोहिमेची पाहणी

16/07/2026
Next Post
उंडरगाव ते तोरंबा पाटी रस्त्याची दुरावस्था; लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन रस्त्याचे काम मार्गी लावण्याची ग्रामस्थांची मागणी

उंडरगाव ते तोरंबा पाटी रस्त्याची दुरावस्था; लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन रस्त्याचे काम मार्गी लावण्याची ग्रामस्थांची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's