लोहारा lohara) तालुक्यातील बेलवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत आषाढी (Ashadhi) एकादशी निमित्त मंगळवारी (दि.१६) दिंडी काढण्यात आली.
त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी व गावातील भजनी मंडळातील लोकांनी अभंग आरती व गीत गायन केले. याप्रसंगी गावातील भजनी मंडळी दगडू जाधव, शिवाजी छत्रे, तुकाराम शिंदे, बिभीषण जाधव, राजकुमार शिंदे इत्यादी भजनी मंडळी उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी दिंडीला चांगला प्रतिसाद दिला. गावातील महिला मंडळांनी दिंडीची आरती करून स्वागत केले. तसेच गावातील सर्व लोकांनी दिंडीची कौतुक केले. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक परमेश्वर सूर्यवंशी, शिक्षक अनंत कानेगावकर, खिजर मोरवे, मल्लिकार्जुन कलशेट्टी, सुनंदा निर्मळे उपस्थित होते. यावेळी छाया जाधव, लहू जाधव यांनी केळी वाटप केले. तर लक्ष्मण जाधव, विजय शिंदे यांनी खाऊ वाटप केले. गावातील भजनी मंडळी दगडू जाधव, शिवाजी छत्रे, हंसराज जाधव, सुभाष शिंदे अंगणवाडी कार्यकर्ती, मदतनीस उपस्थित होते. दिंडी निमित्त विद्यार्थ्यांनी फुगडी व रिंगण धरले. या दिंडीस गावातील महिलांचा सहभाग लाभला.