Thursday, October 29, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पाचे दरवाजे उघडले; नदीपात्राजवळील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

by मुख्य संपादक
in Blog, लोहारा तालुका
A A
0

लोहारा (Lohara) तालुक्यातील माकणी (Makni) येथील निम्न तेरणा (Nimn Terna) प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून प्रकल्प जवळपास भरत आल्याने मंगळवारी (दि.२४) सायंकाळी ५.३० च्या सुमारास या प्रकल्पाचे चार दरवाजे १० सेंटीमीटरने उघडून नदीपात्रात १५२३ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. बुधवारी (दि.२५) सकाळी प्रकल्पाचे सर्व दरवाजे उघडण्यात आली असून १६००५ क्यूसेक्स पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

तालुक्यातील माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पाची एकूण साठवण क्षमता १२१ दलघमी एवढी असून उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता ९१.२२१ दलघमी एवढी आहे. यावर्षी पावसाळ्यात झालेल्या जोरदार पावसामुळे व उस्मानाबाद तालुक्यातील तेरणा धरणातून आलेल्या पाण्यामुळे माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली होती. मंगळवार पर्यंत या प्रकल्पात जवळपास ९५ टक्के पाणीसाठा झाला होता. माकणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सोमवारी रात्री व मंगळवारी पहाटे पाऊस झाल्यामुळे पाण्याची आवक लक्षात घेऊन पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने मंगळवारी (दि.२४) सायंकाळी ५.३० च्या सुमारास या प्रकल्पाचे चार दरवाजे १० सेंटीमीटरने उघडून नदीपात्रात १५२३ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. प्रकल्पातून पाणी सोडल्याने नदीपात्राजवळील नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. या प्रकल्पाची निर्मिती १९८९ साली झाली आहे. त्यावेळी पासून हा प्रकल्प ११ वेळा पूर्ण क्षमतेने भरला होता. यावर्षी पुन्हा एकदा हा प्रकल्प भरल्याने प्रकल्प भरण्याची ही १२ वी वेळ आहे. या प्रकल्पाच्या उजव्या व डाव्या कालव्याच्या माध्यमातून सिंचनासाठी पाणी सोडण्यात येते. उजव्या कालव्या लगतच्या माकणी, सास्तूर, राजेगाव, पेठसांगवी, होळी, कवठा आदी एकूण २३ गावातील शेतकऱ्यांना तर डाव्या कालव्या लगतच्या सारणी, मंगरूळ, आदीसह २० गावातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी या प्रकल्पातून पाणी उपलब्ध करून देण्यात येते. सध्या प्रकल्पाचे सर्व दरवाजे उघडण्यात आली असून १६००५ क्यूसेक्स पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.

मंगळवारी सायंकाळी प्रकल्पाचे चार दरवाजे १० सेंटीमीटरने उघडून नदीपात्रात विसर्ग करण्यात आला. पाण्याची आवक लक्षात घेऊन बुधवारी सकाळपर्यंत सर्व दरवाजे उघडून नदीपात्रात विसर्ग करण्यात येत आहे. धरणात पाण्याची होणारी आवक पाहता सुरू असलेला हा विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे.

के. आर. येणगे,
शाखा अभियंता

\"\"
Ad 2
Ad 1
Tags: निम्न तेरणा प्रकल्प माकणीलोहारा
Previous Post

आ. ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते 5 कोटी 80 लाखांच्या विकास कामांचे भूमिपूजन

Next Post

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी लोहारा तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने उपोषण

Related Posts

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया
लोहारा तालुका

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

Next Post

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी लोहारा तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने उपोषण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!