महाराष्ट्र राज्य उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान साहित्य केंद्र आयोजित करेल कथेच्या वतीने कट्टा च्या वतीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पोलीस आणि आर्मी भरती पूर्व प्रशिक्षण सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून उमरगा येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय करिअर कट्टा एक्सलन्स सेंटर महाविद्यालय म्हणून निवड झालेल्या सेंटरमध्ये पोलीस व आर्मी भरती पूर्व प्रशिक्षण अकॅडमी सुरू करण्यास प्रमाणपत्र माहिती व तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे प्राचार्य डॉ हरिदास विधाते यांच्या शुभहस्ते प्राचार्य डॉक्टर संजय अस्वले यांना देण्यात आले.
पुणे येथील यशदा प्रशिक्षण केंद्रामध्ये युवा धोरण निश्चिती आणि पोलीस प्रशिक्षण केंद्र प्रशिक्षण दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेत महाराष्ट्रातील निवडक सेंटर ऑफ एक्सलन्स महाविद्यालयामध्ये करिअर कट्ट्याच्या वतीने पोलीस प्रशिक्षण अकॅडमी सुरू करण्यात आली आहे. या कार्यशाळेसाठी उमरगा श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील प्राचार्य डॉ अस्वले आणि समन्वयक डॉ. ए के कटके, डॉ सी डी करे आणि पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षक मद्रे सर यांची उपस्थिती होती.
यावेळी यावेळी करीअर कट्टा नागपूर जिल्हा समन्वयक डॉ रंजना जीवने मॅडम बीड जिल्हा समन्वयक डॉ नरसाळे यांची उपस्थिती होती. श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात सुरू असलेल्या पोलिस व आर्मी भरती पूर्व प्रशिक्षण अकॅडमी मध्ये 70 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे. या अकॅडमी मध्ये दररोज सकाळी आणि सायंकाळी फिजिकल प्रशिक्षण आणि दुपारी लेखी परीक्षेची तयारी करून घेतली जाते. तसेच करियर कट्ट्याचे ऑनलाईन लेक्चर संध्याकाळी उपलब्ध आहे. मुलींसाठी वस्तीगृहाची स्वतंत्र सोय आहे. तरी अकॅडमीमध्ये प्रवेश घ्यावा असे आव्हान प्राचार्य आणि करिअर कट्टा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.