Vartadoot
Wednesday, July 29, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

माकणी येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रा महोत्सवास सुरुवात

मुख्य संपादक by मुख्य संपादक
15/12/2024
in लोहारा तालुका
A A
0
माकणी येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रा महोत्सवास सुरुवात
Ad 10

लोहारा तालुक्यातील माकणी येथील ग्रामदैवत श्री सिध्देश्वर यात्रा महोत्सवास शनिवारी (दि. १४) सुरुवात झाली आहे. यावेळी श्री सिध्देश्वर दर्शन व काल्याच्या कार्यक्रमासाठी माकणीसह परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जंगी कुस्त्यांचा फड रंगणार आहे. रविवारी (दि. १५) दुपारी कुस्त्याचा जंगी फड रंगणार आहे.
              लोहारा, उमरगा, औसा तालुक्यातील भक्तांचे श्रध्दास्थान असलेले लोहारा तालुक्यातील माकणी येथील ग्रामदैवत श्री सिध्देश्वर मंदिर येथे दरवर्षी दत्त जयंतीनिमित्त यात्रा भरवली जाते. यात्रेनिमित्त माकणी येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरात दि. ८ पासून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला होता. या सप्ताहा दरम्यान दररोज विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. शनिवारी या यात्रेची सुरुवात झाली. या दरम्यान विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
                   शनिवारी ( दि.१४) येथील विठ्ठल रुक्मीणी मंदिरापासून श्री सिध्देश्वर मंदिरापर्यंत गावातील मुख्य रस्त्याने ढोल ताशा, हलगी, टाळ मृदंगाच्या गजरात श्री च्या काठीची मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक सायंकाळी ५.३० च्या दरम्यान सिद्धेश्वर मंदिर परिसरात आली. त्यानंतर शिऊर ( ता. औसा ) येथील श्री वीरभद्रप्पा स्वामी शिऊरकर, मठाधिश शामचैतन्य महाराज, महेश महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत काल्याच्या वाटपाने मिरवणूकीचे विसर्जन करण्यात आले. शनिवारी पहाटेपासूनच मंदिरात सिध्देश्वराच्या अभिषेक व दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. या यात्रेनिमित्त मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या यात्रा महोत्सवाचे मुख्य आकर्षण असलेला कुस्तीचा जंगी फड रविवारी (दि.१५) होणार आहे. यासाठी यात्रा कमिटी, ग्रामपंचायत कार्यालय व गावातील कुस्तीगीराकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. या यात्रेत लहान मुलांच्या मनोरंजनासाठी रहाट पाळणे, ब्रेक डान्स, यासारखे अनेक मनोरंजनाची साधने आली आहेत. याबरोबरच केळी, गृहपयोगी वस्तू, खेळणी, सौन्दर्य प्रसाधने, हॉटेल, गिरके आदी व्यापारीही त्यांची दुकाने घेवून मोठ्या संख्येने आली आहेत. ही यात्रा पुर्वीपासून केळीच्या व्यापारासाठी प्रसिध्द आहे. या यात्रेदरम्यान केळीच्या व्यापारातून दरवर्षी लाखो रुपयांची उलाढाल होते. यामुळे परिसरातील केळीचे व्यापारी मोठ्या संख्येने येतात. यात्रेदरम्यान कुठल्याही प्रकारचे अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलीस निरीक्षक अजित चिंतले, पोलीस उपनिरीक्षक सचिन केंद्रे यांच्यासह पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: माकणीलोहारासिद्धेश्वर यात्रा महोत्सव माकणी
Previous Post

आधार सेवा फाउंडेशन आणि शालेय शिक्षण समितीने दिले निवेदन

Next Post

माकणी येथील सिद्धेश्वर यात्रेत कुस्त्यांची दंगल – माकणीच्या राम कुसळकरने जिंकली अंतिम कुस्ती

Related Posts

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी
लोहारा तालुका

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी

26/07/2026
आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी
लोहारा तालुका

आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी

26/07/2026
वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी
लोहारा तालुका

वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी

25/07/2026
Auto Draft
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत आषाढी दिंडी सोहळा

25/07/2026
हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

24/07/2026
लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान
लोहारा तालुका

लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान

23/07/2026
Next Post
माकणी येथील सिद्धेश्वर यात्रेत कुस्त्यांची दंगल – माकणीच्या राम कुसळकरने जिंकली अंतिम कुस्ती

माकणी येथील सिद्धेश्वर यात्रेत कुस्त्यांची दंगल - माकणीच्या राम कुसळकरने जिंकली अंतिम कुस्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's