Vartadoot
Saturday, August 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

विविध प्रलंबित मागण्यांसाठी कृषी सहाय्यक आक्रमक; तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर केले धरणे आंदोलन

मुख्य संपादक by मुख्य संपादक
08/05/2025
in लोहारा तालुका
A A
0
विविध प्रलंबित मागण्यांसाठी कृषी सहाय्यक आक्रमक; तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर केले धरणे आंदोलन
Ad 10

कृषी सहाय्यकांच्या प्रलंबित विविध मागण्यांसाठी लोहारा तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर कृषी सहाय्यक संघटना लोहारा शाखेच्या वतीने बुधवारी (दि.७) धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी कृषी सहाय्यकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
याबाबत कृषी सहाय्यक संघटनेने म्हणले आहे की, कृषी सेवक कालावधी रद्द करून कृषी सेवकांना नियमित कृषी सहाय्यक पदावर नियुक्ती द्यावी, कृषी सहाय्यकांचे पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करावे, कृषी विभागातील कामकाज पूर्णपणे डिजिटल झाले असूनही कृषी सहाय्यकांना लॅपटॉप दिला जात नाही तो देण्यात यावा, ग्रामस्तरावर काम करण्यासाठी कृषी मदतनीस मिळावा, निविष्ठा वाटपातील अडचणी दूर कराव्यात आणि वाहतूक खर्चाची तरतूद करावी, पदे वाढवून कृषी सहाय्यकांच्या पदोन्नतीमधील अडचणी दूर कराव्यात. पोखरा योजनेत समुह सहाय्यकांची पदे पूर्वीप्रमाणे भरावी, मनरेगा योजनेत उद्दिष्ट्ये देताना क्षेत्रीय अडचणी विचारात घ्याव्यात, नैसर्गिक आपत्तीच्या पंचनाम्याबाबत नियमावली निश्चित करावी, सिल्लोड येथील कृषी सहाय्यकाच्या आत्महत्येप्रकरणी दोषींवर कारवाई करावी, कृषी सहाय्यक संवर्गाच्या आस्थापना विषयक अडचणी सोडवाव्यात आदी अनेक मागण्यासाठी कृषी सहाय्यकांच्या राज्य संघटनेने वेळोवेळी आवाज उठवला आहे. याबाबत शासनासोबत चर्चाही झाली परंतु ठोस निर्णय झाला नाही. याबाबत त्वरित निर्णय घ्यावा अन्यथा संघटनेने आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे असा ईशारा निवेदनाद्वारे दिला होता.
त्यानुसार कृषी सहाय्यक संघटनेने दि. ५ मे रोजी काळ्या फिती लावून निषेध करत आंदोलनास सुरुवात केली. त्यानंतर दि.६ मे रोजी कृषी सहाय्यक शासकीय व्हाट्सएप ग्रुप मधून बाहेर पडले. बुधवारी (दि. ७) तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले आहे. दि.८ रोजी सामूहिक रजा, दि. ९ रोजी ऑनलाईन कामावर बहिष्कार तसेच त्यानंतरही मागण्या मान्य झाल्या नाहीत तर दि. १५ मे पासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा ईशारा कृषी सहाय्यकांनी दिल्याचे तालुकाध्यक्ष नागेश जट्टे यांनी सांगितले.
या धरणे आंदोलनात बाळासाहेब बिराजदार, शैलेश जट्टे, राहुल चेंडके, दीपक जाधव, आय.डी. पाटील, किशोर गायकवाड, चंद्रकांत पाटील, सुरेश मारूबले, ज्योती पवार, मनीषा जाधव, किरण जाधव, चिदानंद स्वामी, सचिन पवार, सचिन चेंडकाळे, माधव बिराजदार, निळकंठ पाटील, अतुल बिराजदार, नितीन चेंडकाळे, गणेश बिराजदार, विक्रम निकम, चंद्रकांत पाटील, विशाल पवार, उमाकांत बिराजदार, प्रमोद पवार आदी कृषी सहाय्यक यावेळी सहभागी झाले होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: कृषी सहाय्यकतालुका कृषी अधिकारीधरणे आंदोलन
Previous Post

चौंडी (अहिल्यानगर) येथे पार पडली राज्य मंत्रिमंडळाची बैठक; वाचा मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

Next Post

उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

Related Posts

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी
लोहारा तालुका

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी

26/07/2026
आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी
लोहारा तालुका

आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी

26/07/2026
वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी
लोहारा तालुका

वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी

25/07/2026
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत आषाढी दिंडी सोहळा

25/07/2026
हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

24/07/2026
लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान
लोहारा तालुका

लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान

23/07/2026
Next Post

उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's