Thursday, October 29, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहाऱ्याचे उपनगराध्यक्ष आयुब शेख यांनी दिला राजीनामा

by मुख्य संपादक
in लोहारा तालुका
A A
0

लोहारा नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष आयुब शेख यांनी बुधवारी (दि. २९) त्यांच्या उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. नगराध्यक्षा वैशाली खराडे यांच्याकडे त्यांनी राजीनामा दिला आहे.
मागील तीन वर्षांपूर्वी लोहारा नगरपंचायत निवडणूक झाली होती. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येत शिव-राष्ट्र आघाडी करून ही निवडणूक लढवली यात शिवसेनेचे नऊ व राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नगरसेवक निवडून आले होते. बहुमत मिळाल्याने शिवराष्ट्र आघाडीच्या ताब्यात ही नगरपंचायत आली. तसेच एका अपक्ष निवडून आलेल्या नगरसेवकाने शिवसेनेत प्रवेश केल्याने त्यांचे संख्याबळ बारा झाले होते. शिवसेनेचे जास्त नगरसेवक निवडून आल्याने नगराध्यक्ष शिवसेनेचा व उपनगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा करण्याचे ठरले. त्यामुळे नगराध्यक्ष पदी शिवसेनेच्या वैशाली खराडे व उपनगराध्यक्षपदी आयुब शेख यांची बिनविरोध निवड करण्यात आली होती. अखेर तीन वर्षानंतर उपनगराध्यक्ष आयुब शेख यांनी त्यांचा पदाचा राजीनामा दिला आहे. नगराध्यक्षा वैशाली खराडे यांच्याकडे त्यांनी त्यांचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देण्यापूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी बोलताना आयुब शेख म्हणाले की, माझ्या पक्षाकडून यापूर्वी माझ्या पत्नी नाजमीन शेख यांना व २०२२ च्या निवडणुकीत मला उपनगराध्यक्ष पदी काम करण्याची संधी दिली. त्यामुळे मी पक्षाचा आभारी आहे.
आमच्या पक्षाचे नेते प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्या आदेशानुसार आज मी माझ्या पदाचा राजीनामा दिला आहे. यापुढील काळात पक्ष संघटनेचे काम करणार असून नगरसेवक म्हणून जनतेची कामे सुरूच राहतील असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. यावेळी त्यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक जालिंदर कोकणे उपस्थित होते. पत्रकार परिषद झाल्यानंतर नगराध्यक्षा वैशाली खराडे यांच्याकडे आयुब शेख यांनी राजीनामा सुपूर्त केला. नगराध्यक्ष शिवसेनेचा व उपनगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा या फॉर्म्युल्या प्रमाणे आता उपनगराध्यक्षपदी माझी निवड करावी अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक जालिंदर कोकणे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. पुढील काही दिवसांत उपनगराध्यक्ष निवडीची प्रक्रिया होईल. उपनगराध्यक्ष पदासाठी दोन, तीन जण इच्छुक असल्याची चर्चा आहे. उपनगराध्यक्ष पद आपल्यालाच मिळावे यासाठी फिल्डिंग लावली जात असल्याचीही चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता उपनगराध्यक्ष पदी कोणाची वर्णी लागणार हे पाहावे लागणार आहे.

Ad 2
Ad 1
Tags: उपनगराध्यक्षलोहारा नगरपंचायत
Previous Post

होळी जिल्हा परिषद शाळेत ध्वजारोहण व स्पर्धेचे बक्षीस वितरण

Next Post

साठवण तलावातील पाणी शेतीसाठी बंद केल्या प्रकरणी परवानाधारक शेतकऱ्यांचे उपोषण सुरू

Related Posts

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया
लोहारा तालुका

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

Next Post

साठवण तलावातील पाणी शेतीसाठी बंद केल्या प्रकरणी परवानाधारक शेतकऱ्यांचे उपोषण सुरू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!