लोहारा शहरातील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात लोहारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस व भानुदासराव चव्हाण महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (दि.२२) रक्तदान शिबिराचे व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष प्रा. सतीश दादा इंगळे व आर्ट, सायन्स, कॉमर्स कॉलेज नळदुर्गचे माजी प्राचार्य डॉ. संजय कोरेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाविद्यालय विकास समिती सदस्य अभिजित लोभे, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. रामदास ढोकळे, देवगिरी ग्लोबल अकॅडमीच्या प्राचार्या स्वाती निकम यांची प्रमुख उपस्थिती होती. या शिबिरामध्ये एकूण ५१ रक्तदात्यांनी रकदान केले. रक्तदान शिबिराच्या यशस्वितेसाठी डॉ. विनोद तुंगे व पृथ्वीराज जगताप यांनी परीश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. रामदास ढोकळे यांनी केले. डॉ. संजय कोरेकर यांनी आपल्या व्याख्यानाच्या माध्यमातून अजितदादाची शैक्षणिक वाटचाली पासून ते राजकीय वाटचालीपर्यंत सर्व इतिहास उलगडून त्यांची कार्यपद्धती व त्यांची समाजाशी, सर्व सामान्यांची आणि गोरगरिबांविषयी असलेली भावना याचे मौलिकस मार्गदर्शन केले.

यावेळी महाविद्यालय विकास समितीचे व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. सतिश इंगळे, महाविद्यालय विकास समिती सदस्य अभिजित लोभे, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. रामदास ढोकळे, देवगिरी ग्लोबल अकॅडमीच्या प्राचार्या स्वाती निकम, एन. एस. एस. कार्यक्रमाधिकारी डॉ. विनोद तुंगे, डॉ. महानंदा मोरे, डॉ. प्रशांत माने, प्रा. राम कदम, प्रा. व्यंकटेश घोडके, प्रा. प्रतिक्षा कदम, प्रा. शिल्पा गायकवाड, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. हनुमंत कलबुर्गे, प्रा. स्नेहलता करदुरे, प्रा. वाकळे, श्री. नवनाथ वकील, श्री. गणेश गरड, श्री. दादा साठे, देवगिरी ग्लोबल अकॅडमीच्या सौ. वैशाली जाधव, सौ. ज्योती साठे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅ. व्यंकट चिकटे यांनी तर डॉ. महानंदा मोरे यांनी आभार मानले.








