बारावी परीक्षेचा निकाल मागील आठवड्यात जाहीर झाला. त्यानंतर आता दहावी परीक्षेचा निकाल कधी जाहीर होणार याची विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये उत्सुकता होती. अखेर दहावी परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे.
लोहारा तालुक्यात दहावीची परीक्षा सुरळीत पार पडली. त्यानंतर विद्यार्थ्यांना उत्सुकता होती ती निकालाची. त्यामुळे निकाल कधी जाहीर होणार याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सोमवारी (दि.१२) दहावी परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर केली असून मंगळवारी (दि.१३) दुपारी एक वाजता दहावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर होणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.
