लोहारा तालुक्यातील लोहारा (खुर्द) येथे दहावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवलेल्या समृद्धी अंकुश शिंदे हिचा रसाळ परिवारातर्फे सत्कार करण्यात आला.
तालुक्यातील लोहारा (खुर्द) येथे हा सत्कार करण्यात आला. नागराळ येथील समृद्धी अंकुश शिंदे ही विद्यार्थिनी देशीकेंद्र विद्यालय लातूर येथे शिकत होती. ती दहावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण घेवून उत्तीर्ण झाली असून तिच्या या यशात तिच्या पालकांचे व कुटुंबियाचेही मोठे योगदान आहे. रसाळ व शिंदे परिवाराने नेहमीच शिक्षणाला प्राधान्य देत परिवारातील यशाची परंपरा कायम ठेवली आहे. समृद्धी हिच्या या यशाबद्दल तिचे सर्वांकडून अभिनंदन व कौतुक होत आहे. यावेळी माजी सहशिक्षक बलभीम रसाळ, अमोल रसाळ, नरहरी रसाळ, सरस्वती रसाळ, पार्वती रसाळ, अंकुश शिंदे, सुरेखा शिंदे, सुलोचना रसाळ-सूर्यवंशी, रागिणी रसाळ, सुजाता रसाळ, पूनम रसाळ, राजेंद्र रसाळ आदी उपस्थित होते. तिचे हे यश विद्यार्थ्यांसाठी प्रेरणदायी आहे.
