पनवेल येथे राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक संघातर्फे महात्मा ज्योतिबा फुले राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यात लोहारा तालुक्यातील पाच शिक्षकांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
पनवेल येथे राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक संघाचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन पार पडले. त्यामध्ये लोहारा तालुक्यातील पाच शिक्षकांना महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनिल नाचपल्ले होते. स्वागत अध्यक्ष म्हणून शिक्षण महर्षी माजी आमदार बाळाराम पाटील होते. यावेळी आमदार प्रवीण स्वामी, राज्य सरचिटणीस संतोष भोजने, सुखदेव भालेकर आदी मान्यवरांच्या उपस्थित हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात कानेगाव येथील मच्छिंद्र बोकडे, माकणी येथील गौरीशंकर कलशेट्टी, माळेगाव येथील शिक्षक पंडित राठोड यांना महात्मा ज्योतिबा फुले राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच मार्डी शाळेतील शिक्षिका वर्षा चौधरी व जेवळी येथील मुक्ता माळी यांना क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.आले. प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप होते. यावेळी राज्यभरातील शिक्षक,शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुरस्कार मिळाल्याबद्दल विकास घोडके, नितीन वाघमारे, रसुल शेख, राहुल ओवांडकर, महादेव कुंभार, रफीक शेख, नयन शेख आदीने सर्वांचे अभिनंदन केले आहे.








