Vartadoot
Sunday, July 26, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी

मुख्य संपादक by मुख्य संपादक
26/07/2026
in लोहारा तालुका
A A
0
आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी
Ad 10

प्रति पंढरपूर म्हणुन ओळख असलेल्या व लाखो वारकरी, भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र कानेगाव मध्ये आषाढी वारीच्या निमित्त शनिवारी (दि. २५) श्री संत शिरोमणी सद्गुरू मारुती महाराज कानेगावकर यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी भाविकांच्या उपस्थितीमुळे परिसरात भक्तीमय वातावरण झाले होते.
प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोहारा तालुक्यातील कानेगाव येथे दरवर्षी आषाढी एकादशीच्या दिवशी विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात. आषाढी एकादशी, कार्तिकी, माघवारी यासह मारूती महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्याला कानेगाव येथे भक्तांची दर्शनासाठी गर्दी होते. कानेगाव येथील संत शिरोमणी मारूती महाराज हे विठ्ठलाचे भक्त होते. कानेगाव येथे संत मारुती महाराजांचे समाधीस्थळ असून याठिकाणी मंदिर उभारण्यात आले

आहे. आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे संत मारूती महाराजांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेण्यासाठी आषाढी एकादशी दिवशी शनिवारी (दि.२५) पहाटेपासूनच भक्तांची रांग लागली होती. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे मंदिरात महापूजा करण्यात आली. यावेळी टाळ मृदंगाच्या गजरात गावातून पालखीची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर मंदिर परिसरात रिंगण सोहळा पार पडला. लोहारा तालुक्यातील अनेक गावांतून कानेगावकडे पायी निघालेल्या शेकडो दिंड्या दुपारी दाखल झाल्या. याठिकाणी समाधीस्थळाचे दर्शन घेण्यासाठी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानिमित्त कानेगावचे नागरिक हरिश्चंद्र निवृत्ती कदम यांच्या तर्फे सर्व भाविक भक्तांना फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी आमदार प्रवीण स्वामी यांनीही समाधी स्थळाचे दर्शन घेऊन वारकरी यांच्या समवेत फुगडी वर ठेका धरला.
यावेळी गावातील विनायक कदम, पांडुरंग लोभे, बालाजी कदम, कुमार कुलकर्णी, ज्ञानदेव कदम, नारायण कदम गुरुजी यांच्यासह कानेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र कानेगावचे सर्व कर्मचारी, लोहारा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी, महावितरणचे कर्मचारी, ग्रामपंचायत कार्यालय कानेगाव व सर्व कानेगाव ग्रामस्थ, युवक व वारकरी भाविक भक्तांनी परिश्रम घेतले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: आषाढी एकादशीकानेगावसंत मारुती महाराज
Previous Post

वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी

Next Post

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी

Related Posts

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी
लोहारा तालुका

25/07/2026
Auto Draft
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत आषाढी दिंडी सोहळा

25/07/2026
हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

24/07/2026
लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान
लोहारा तालुका

लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान

23/07/2026
माळेगाव येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्रीधर गर्जे तर उपाध्यक्षपदी ज्योती कुंभार यांची निवड
लोहारा तालुका

माळेगाव येथील शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी श्रीधर गर्जे तर उपाध्यक्षपदी ज्योती कुंभार यांची निवड

18/07/2026
Next Post
ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's