लोहारा येथील भारतमाता मंदिरात रविवारी (दि.१२) राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी रा.स्व.संघ व जनकल्याण समिती संचलित भारतमाता मंदिर प्रकल्पाचे पूर्णवेळ कार्यकर्ते शंकर जाधव, उत्तम पाटील, प्राचार्य शहाजी जाधव, प्रा. यशवंत चंदनशिवे, माजी नगरसेवक श्रीनिवास माळी, दत्ताजी जावळे पाटील, रमेश वाघुले, अंबादास पोतदार आदी मान्यवर उपस्थित होते.