जागतिक महिला दिनानिमित्त लोहारा शहरात शनिवारी (दि.८) महिला, नागरिक व बालकांसाठी मोफत दंत रोग तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी डॉ. मयुरी आम्लेश्वर गारठे यांनी ८० जणांची मोफत दंत तपासणी केली. यावेळी डॉ. आम्लेश्वर गारठे, सोमनाथ माळी, गोविंद जाधव, मुकेश कदम, साहेबराव थोरात, ज्ञानेश्वर जाधव, कोमल ठेले, दिपाली परसे, भाग्यश्री कांबळे यांच्यासह महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोमेश्वर मल्टी-स्पेशालिटी हाँस्पिटल यांच्या वतीने सामाजिक भावना जपत जागतिक महिला दिनानिमित्त शहरात महिला व नागरिकांची मोफत दंतरोग तपासणी शिबीर घेतल्यामुळे परिसरातील महिला व नागरिकांतुन समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
