लोहारा तालुक्यातील धानुरी येथील विद्यामाता इंग्लिश स्कूलमध्ये हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
तालुक्यातील धानुरी येथील विद्यामाता इंग्लिश स्कुलमध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला. हळदी कुंकू कार्यक्रमानिमित्त महिलांसाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात रांगोळी स्पर्धा, धावणे, उखाणे, वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या व विजयी माता पालकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेच्या मुख्याध्यापिका हिरा सोलापूरे व सर्व शिक्षिका यांच्या हस्ते करण्यात आले. विजयी माता पालकांचा सत्कार किशोर साळुंके, मुख्याध्यापिका हिरा सोलापूरे व सर्व शिक्षकाच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध स्टॉल लावून स्व कमाईचा आनंद घेतला. पालकांनी ही त्याला भरभरून प्रतिसाद दिला. हा कार्यक्रम सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने मोठ्या आनंदात पार पडला.
