लोहारा तालुक्यातील लोहारा खुर्द येथील हणमंत रसाळ याची सांख्यिकी अधिकारी वर्ग २ या पदावर निवड झाल्याबद्दल मित्र परिवाराच्या वतीने सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
तालुक्यातील लोहारा खुर्द येथील हणमंत ज्ञानेश्वर रसाळ यांनी कर्मचारी निवड आयोगाच्या (SSC) संयुक्त पदवीस्तर (CGL) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून सांख्यिकी अधिकारी वर्ग २ (मंत्रालय, मुंबई) या पदासाठी त्यांची निवड झाली आहे. या अभिमानास्पद यशानिमित्त शिवसेना ठाकरे गट तालुकाप्रमुख अमोल बिराजदार, नगरसेवक अविनाश माळी, अविनाश रसाळ, अजय रसाळ, मंगेश गोरे आणि सर्व मित्रपरिवार यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी हणमंत रसाळ यांच्या मेहनतीचे आणि जिद्दीचे विशेष कौतुक केले. तसेच त्यांच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.