लोहारा (Lohara) तालुक्यातील भातागळी येथे गुणवंत व स्पर्धा परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा रविवारी (दि.२७) सत्कार करण्यात आला.
कामधेन सेवा परिवाराचे (Kamdhenu seva pariwar) संस्थापक डॉ. लक्ष्मण आसबे, इंदापूर यांच्या प्रेरणेतून गुणवंत विद्यार्थी व स्पर्धा परिक्षेत यश संपादन केलेले विद्यार्थी यांचा सत्कार सोहळा तसेच गरिब होतकरु विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरणाचा कार्यक्रम तालुक्यातील भातागळी येथील मारुती मंदिरात घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीशैल्य वाले हे होते. या कार्यक्रमासाठी ॲड. निलीमा जगताप, सरपंच सुषमा माने, उपसरपंच हणमंत जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक दत्ता पवार यांनी केले. यावेळी ॲड. निलीमा पाटील, शंकर जगताप यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कामधेनू सेवा परिवार भातागळी शाखेचे अध्यक्ष रवि जगताप, कोंडीबा कारभारी, दत्ता पवार, दत्ता वाघमारे, दादा काकडे, आप्पा कारभारी, बालाजी यादव यांनी परीश्रम घेतले.