लोहारा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने बुधवारी (दि.५) पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या न्यायासाठी लोहारा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनामध्ये म्हणले आहे की, माकणी, जेवळी आणि धानुरी मंडळातील पीक कापणी प्रयोग संदर्भातील संपूर्ण माहिती सार्वजनिक करण्याची प्रमुख मागणी केली. तसेच यासाठी संबंधित पीक कापणी प्रयोगांचे पंचनामे, नोंदी आणि प्रमाणित प्रती तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली. या प्रक्रियेत पारदर्शकता आल्यास वस्तुस्थिती स्पष्ट होईल आणि पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळण्यास मदत होईल. प्रशासनाने ही माहिती तातडीने उपलब्ध करून द्यावी. अन्यथा शेतकऱ्यांच्या न्यायासाठी दि. १२ ऑगस्ट रोजी लोहारा येथे लोहारा तालुका काँग्रेस कमिटी व पिक विमा वंचित शेतकरी समवेत रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. असा ईशारा या निवेदनात दिला आहे.

यावेळी तालुकाध्यक्ष दयानंद पाटील, माजी तालुकाध्यक्ष श्यामसुंदर तोरकडे, अँड. सयाजी शिंदे, बसवराज पाटील, अँड. माशाळकर, प्रीतम शिंदे, युवक शहराध्यक्ष प्रकाश होंडराव, विजयकुमार गोफने, मनोहर पाटील, राजू सोलंकर, मारुती रोडगे, संदीप पाटील, शिवानंद तोरकडे, दिलीप फुंडीपल्ले, विनोद थोरात, रोहित शिंदे, करण कांबळे, पुरुषोत्तम सितापुरे, ओम लोभे, शेखर चौगुले, उमर शेख, योगेश मिटकरी, काशिनाथ जट्टे आदींसह शेतकरी व पदाधिकारी उपस्थित होते. तहसीलदार रणजितसिंह कोळेकर यांनी हे निवेदन स्वीकारले.







