भाजपाच्या लोहारा तालुकाध्यक्ष कोणाची निवड होणार याची उत्सुकता पदाधिकाऱ्यांना होती. अखेर तालुकाध्यक्ष निवडीची घोषणा करण्यात आली असून तालुकाध्यक्ष पदी राजेंद्र पाटील यांची निवड झाली आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी मंगळवारी (दि.१५) प्रसिद्धी पत्रक काढले असून यात राजेंद्र पाटील यांची निवड झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.

