लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयात महसूल दिनानिमित्त नायब तहसीलदार रतन काजळे, मंडळ अधिकारी प्रवीण कोकणे व तलाठी आदी महसूल कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
तालुक्यातील सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात महसूल दिनानिमित्त लोहारा तहसिल कार्यालयातील नायब तहसीलदार रतन काजळे, मंडळ अधिकारी प्रवीण कोकणे, तलाठी एच. बी. अंकुशे यांच्यासह महसूल कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नायब तहसीलदार रतन काजळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना महसूल विभागाबद्दल माहिती सांगितली. तसेच अभ्यासाबरोबर खेळाचे महत्व सांगितले. तलाठी अंकुशे यांनी स्त्री शिक्षणाचे महत्त्व सांगितले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यापूर्वी शाळेच्या वतीने शाळा परिसरात ४०० झाडांचे वृक्षारोपण केले आहे. या झाडास ड्रीप केलेले पाहून मान्यवरांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम. एन. पाटील यांनी तर मुख्याध्यापक रवींद्र मुगळे यांनी आभार मानले.

