लोहारा येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलमध्ये मंगळवारी (दि.३१) क्रिडा स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यावेळी विविध क्रीडा स्पर्धांत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला होता.
लोहारा पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विनोद जोकार व प्राचार्य शहाजी जाधव यांच्या हस्ते मशाल पेटवून करण्यात आले. यावेळी स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विनोद जोकार म्हणाले की, निरोगी शरिरातच निरोगी मन वास करते त्यामुळे आपले शरीर सुदृढ राहण्यासाठी आपण जंक फूड व रस्त्यावरील पदार्थ न खाता भरपूर प्रमाणात पालेभाज्या, फळे खावीत. तसेच दररोज योगासने, व्यायाम करावे आणि नियमित मैदानी खेळ खेळणे आवश्यक आहे असे प्रतिपादन करून सर्व विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी शूभेच्छा दिल्या. यानंतर स्पर्धेतील सर्व सहभागी खेळाडूंना मनस्वी देवकर हिने क्रिडा शपथ दिली. यावेळी पूर्व प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांच्या फ्रॉग जंप, कांगारू जंप, बुक – बॅलेन्स, धावणे, चमचा लिंबू, तसेच इयत्ता पहिली ते आठवी वर्गातील विद्यार्थ्यांचे धावणे, टांगा रेस, थ्री लेग रेस, सॅक रेस, लांब उडी, उंच उडी, धावणे, कब्बडी, खो – खो अशा विविध प्रकारच्या खेळाच्या स्पर्धा घेण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिस सविता जाधव यांनी तर आभार प्रदर्शन श्री सिद्धेश्वर सुरवसे यांनी केले. क्रिडा स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मिस रेश्मा शेख, सुलोचना वकील, हेमा पाटील, सरिता पवार , मीरा माने, अनिता मनशेट्टी, ईश्वरी जमादार, वैशाली गोरे, लक्ष्मी करदोरे, सोनाली काटे, शीतल बिराजदार यांनी अथक परिश्रम घेतले.