Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

माकणी येथील उच्चशिक्षित कुटुंब घडवणारी संघर्षशील आणि प्रेरणादायी माता ‘आदर्श माता – आदर्श नारी’ पुरस्काराने सन्मानित

by मुख्य संपादक
in लोहारा तालुका
A A
0

अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघ संलग्नित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त धाराशिव जिल्ह्यातील कर्तबगार महिलांचा ‘आदर्श माता-आदर्श नारी’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
माकणी गावातील उच्च शिक्षित कुटुंब घडवणाऱ्या श्रीमती गयाबाई प्रभाकर शिंदे यांना दिनांक २३ मार्च रोजी सदर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पुरस्कारार्थी गयाबाई आणि त्यांचे पती प्रभाकर शिंदे हे पूर्ण अशिक्षित होते. घरामध्ये बारमाही दारिद्र्य, अतिशय हलाकीची परिस्तिथी, पती सालगडी म्हणून कामे करत आणि या घरातील शेळ्या पालन करणे, खुरपणी करणे असे पडेल ती कामे केली. आपल्या वाट्याला जे दारिद्र्य, गरिबी आलीय, ती लेकरांच्या नशिबी येऊ द्यायची नाही, काहीही झालं तरी लेकरांना शाळा शिकवायची या मतावर मात्र दोघे ठाम होते. पती प्रभाकर शिंदे यांचे निधन झाल्यानंतर दोघांनी एकत्र पाहिलेल्या स्वप्नांचा पाठपुरावा त्यांनी अखंड चालू ठेवला. कुटुंबाला गरज असतानाही केवळ आपल्या मुलांचे भविष्य उज्वल व्हावे म्हणून स्वतःच्या काळजावर दगड ठेवून मुलांना पुण्यासारख्या ठिकाणी स्वतःपासून दूर पाठवले होते. स्वतःचे अश्रू पुसत अनेक आव्हानात्मक परिस्थितीला तोंड देत, लेकरांना त्यांच्या आयुष्यात आलेल्या वादळांना सामना करण्यास शिकवले. लेकरांना कधी रागावून तरी कधी मायेन समजावून घडवले.
सर्व लेकरांना मानसिकदृष्ट्या कधीच खचू दिले नाही. त्यांची मुले महादेव प्रभाकर शिंदे यांचे शिक्षण रसायनशास्त्र या विषयात सेट , नेट (JRF), पी. एच. डी (पुणे विद्यापीठ), पोस्ट डॉक्टरेट (साऊथ कोरियातून) त्याच बरोबर विशेष बाब म्हणजे त्यांना तत्कालीन राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांच्या हस्ते \’भूकंपग्रस्त आदर्श विद्यार्थी\’ पुरस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर उच्चशिक्षणासाठी दिली जाणारी अमेरिकेमधील विशेष फेलोशिप धारक आहेत. सद्या ते वरिष्ठ प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा दुसरा मुलगा बळीराम प्रभाकर शिंदे हा महसूल खात्यामध्ये कार्यरत आहे. त्यांचा तिसरा मुलगा विष्णु शिंदे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मधून समाजशास्त्र या विषयात पी. एच. डी. करत आहे. विशेष बाब म्हणजे गेल्या वर्षी नॉर्वे येथील यु.एस.एन. या विद्यापीठातर्फे नार्वे या देशात जाऊन संशोधन करण्यासाठी त्यांना ‘इंटरनॅशनल मोबिलिटी फेलोशिप २०२३’ जाहीर झाली आहे. सद्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. दोन मुली सविता आणि मनीषा या उच्चशिक्षण करून आता शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा उच्चशिक्षित लहान मुलगा सर्वांच्या पाठींब्याने व महापुरुषांनी सांगून गेल्याप्रमाणे ‘आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो’ या प्रेरणेतून स्फुर्ती घेऊन या पुरस्कार्थी मातेचे लेकरे आयसीड या सामाजिक संस्थेची स्थापना करून गरीब घरातील मुला-मुलींच्या शिक्षणासाठी भरीव मदत करत आहे.
सदर पुरस्कार मा. आ. राणा जगजितसिंह पाटील , मा. अॅड. मीरा कुलकर्णी आणि इतर मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला आहे. त्याचबरोबर या पुरस्कार वितरण कार्यक्रमास म. रा. शि. परिषद प्रांत अध्यक्ष मा. मधुकर उन्हाळे, भाजप धाराशिव अध्यक्ष मा. नितीनजी काळे, जिल्हा महिला आघाडी प्रमुख मा. पल्लवी पिसे , सौ. अंजली काळे,सौ. दिपाली काळे, सौ. दैवशाला हाके यांची प्रमुख उपस्थिती होती. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य शिक्षक महिला आघाडी धाराशिव जिल्हा शाखा पदाधिकारी सौ. ज्योती राऊत, सौ. ज्योती साकोळे, सौ. प्रमिला वाघे , सौ. रेखा डाके आणि माकणी गावतील आदर्श शिक्षक गौरीशंकर कलशेट्टी आदी उपस्थित होते.

Ad 2
Ad 1
Tags: आदर्श मातापुरस्कार.
Previous Post

मुख्यमंत्री शंभर दिवस कार्यक्रमांतर्गत मार्डी येथे कार्यक्रम

Next Post

सास्तूर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक क्षयरोग दिन साजरा

Related Posts

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

Next Post

सास्तूर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक क्षयरोग दिन साजरा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!