लोहारा शहरातील वसंतदादा पाटील हायस्कूल संलग्न नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत यश संपादन केले आहे.
धाराशिव येथे जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय धाराशिव व क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या संयुक्त विद्यमान घेण्याते आलेल्या जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत लोहारा शहरातील वसंतदादा पाटील हायस्कूल संलग्न नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयाच्या १९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विविध वजन गटातील स्पर्धेत या विद्यालयाच्या १४ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. तसेच विभागीय स्पर्धेसाठी विद्यालयाच्या ६ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. विविध वजनगटात यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत. ४० किलो वजन गट – श्रावणी पवार, आरती पवार, ६४ किलो वजन गट – प्रणाली माने, ७६ किलो वजन गट – श्वेता शिवराज झिंगाडे, ७१ किलो वजन गट – सुकेशनी बालाजी माटे, ४५ किलो वजन गट – साक्षी शिवाजी पवार, पायल दत्ता कुंभार, १९ वर्ष मुली ४९ किलो वजन गट – सपना नेताजी भोकरे, ५५ किलो वजन गट – अंकिता सूर्यवंशी, ५९ किलो वजन गट – प्राची नामदेव गोरे, अंजली गोरे, १७ वर्ष मुले ६७ किलो वजन गट – आदित्य कोकाटे, ७३ किलो वजन गट – कृष्णा कदम, ८९ किलो वजन गट – महेश हातीसकर. सर्व यशस्वी विद्यार्थांचे शाळेच्या मुख्याध्यापिका यु. व्ही. पाटील, संस्थेचे सचिव डॉ. शेषेराव जावळे पाटील यांनी अभिनंदन करून विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. या सर्व विद्यार्थ्यांचा शाळेत सत्कार करण्यात आला. यावेळी क्रीडा विभागप्रमुख व प्रशिक्षक नागनाथ पांढरे, प्रा. प्रशांत काळे, भास्कर जाधव, दिलीप जाधव, धनराज धनवडे, श्रीकांत मोरे, सुलोचना रसाळ, पौर्णिमा घोडके यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
विभागीय स्पर्धेसाठी यांची झाली निवड
श्रावणी पवार, आरती पवार, प्रणाली माने, श्वेता झिंगाडे, सपना भोकरे, अंकिता सूर्यवंशी या विद्यार्थीनींचा विविध वजन गटात प्रथम क्रमांक आल्यामुळे विभागीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे.