Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा तालुक्यात आजपासून होणार सर्व्हेक्षण ; रविवारी एकूण २०० कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

by मुख्य संपादक
in लोहारा तालुका
A A
0

मराठा आरक्षण (Maratha Reservation) प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यादृष्टीने मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील जातीचे सर्वेक्षण करून माहिती गोळा करण्यासाठी प्रशासनाकडून तातडीचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्या अनुषंगाने लोहारा (Lohara) तहसील कार्यालयात रविवारी (दि. २१) सर्वेक्षणासाठी नेमण्यात आलेल्या प्रगणक, पर्यवक्षकांसह २०० कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. तालुक्यात आजपासून ३१ जानेवारी पर्यंत हे सर्व्हेक्षण (Survey) करण्यात येणार आहे.
मराठा (Maratha) समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी मागील अनेक महिन्यांपासून जोरदार आंदोलने, उपोषणे केली जात आहेत. मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टीने राज्य सरकारकडूनही प्रयत्न सुरू आहेत. मराठा समाजाचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगामार्फत युद्धपातळीवर सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने दि. २३ ते ३१ जानेवारीदरम्यान कालबद्धरीतीने अचूक सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

\"सर्व्हेक्षण\" \"\"

त्या अनुषंगाने तालुकास्तरावर सर्वेक्षणासाठी १८८ प्रगणक तर १२ पर्यवेक्षक असे एकूण २०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तहसील (tahsil) कार्यालयातील सभागृहात रविवारी (दि.२१) तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांच्या उपस्थितीत प्रगणक, पर्यवेक्षकांना सर्वेक्षण कशा पद्धतीने करावे याबाबत माहिती देण्यात आली. सकाळ व दुपार अशा दोन सत्रांत या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण (Training) देण्यात आले. मंगळवारपासून (दि. २३) तालुक्यात सर्वेक्षण होणार आहे. तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, गटशिक्षण अधिकारी आदी सर्वेक्षणाबाबतीत क्षेत्रीय स्तरावर या कामाचे वेळोवेळी भेटी देऊन पर्यवेक्षण करणार आहेत. दि. ३१ जानेवारी पर्यंत हे सर्व्हेक्षण केले जाणार आहे. मराठा समाजाचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण अतिशय महत्त्वाचे असून विविध माध्यमांतून लोकांना याविषयी माहिती देत आहोत. सर्वेक्षणा दरम्यान कुटुंबप्रमुखांनी घरी थांबून आपली माहिती प्रगणकांना द्यावी असे आवाहन तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी केले आहे.

Ad 2
Ad 1
Tags: मराठा आरक्षणसर्व्हेक्षण
Previous Post

लोहारा शहरातील भानुदासराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयात निरोप समारंभ – विद्यार्थ्यांनी स्वतःमधील विशेष गुण ओळखून करिअर निवडावे – प्रा. संतोष पवार

Next Post

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त लोहारा तालुका शिवसेनेच्या वतीने अभिवादन

Related Posts

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

Next Post

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त लोहारा तालुका शिवसेनेच्या वतीने अभिवादन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!