लोहारा तालुक्यातील माकणी येथील भारत विद्यालयात शुक्रवारी (दि. ६) तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन घेण्यात आले. या विज्ञान प्रदर्शनात एकूण ६५ शाळांनी प्रयोगाचे सादरीकरण केले.
गटशिक्षण कार्यालय लोहारा व भारत विद्यालय माकणी यांच्या संयुक्त विद्यमाने या विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान या विषयावर हे विज्ञान प्रदर्शन होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य राम जाधव हे होते. यावेळी विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटक आमदार प्रवीण स्वामी, तहसीलदार रणजितसिंह कोळेकर, माकणीच्या सरपंच स्वाती साठे, उपसरपंच फुलचंद आळंगे, माजी सरपंच विठ्ठल साठे, प्रभारी गटशिक्षणाधिकारी सुभाष चव्हाण, जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष रवींद्र स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आमदार प्रविण स्वामी यांच्या हस्ते या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार प्रवीण स्वामी, तहसीलदार रणजितसिंह कोळेकर, विज्ञान मंडळाचे अध्यक्ष रवींद्र स्वामी, प्राचार्य राम जाधव यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना आमदार प्रवीण स्वामी म्हणाले की, प्रत्येक गोष्टीला तुम्ही का हा प्रश्न जेंव्हा विचारता, त्यापुढे जाऊन तुम्ही त्या प्रश्नांची उकल करू शकलात तेंव्हा तुम्ही विज्ञानवादी आहात असं समजलं जातं. त्यामुळे विद्यार्थ्यांनी चिकित्सक असले पाहिजे. तुम्ही जे काही करता ते अतिशय छान, सुंदर करायचं, मन लावून करायचं. विद्यार्थ्यांनो, भरपूर अभ्यास करा असे आवाहन आमदार प्रवीण स्वामी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना केले.
या विज्ञान प्रदर्शनात तालुक्यातील एकूण ६५ शाळांनी सहभाग घेतला होता. यावेळी प्राथमिक शाळांचे ५१ व माध्यमिक शाळांचे २३ असे एकूण ७४ प्रयोगाचे सादरीकरण करण्यात आले. तसेच शिक्षकशैक्षणिक साहित्य प्रदर्शनात प्राथमिक मधून ११ तर माध्यमिक ३ असे एकूण १४ साहित्य सादर करण्यात आले. यावेळी परीक्षक म्हणून प्रा. आर.डी. साळुंके, प्रा. आर.सी. आष्टेकर व एस.पी. गिरी यांनी काम पाहिले. प्रास्ताविक प्रभारी गटशिक्षणाधिकारी सुभाष चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन दिपक शिंदे यांनी केले.
विज्ञान प्रदर्शन निकाल खालीलप्रमाणे –
प्राथमिक गट –
प्रथम – भारत विद्यालय माकणी ( लेझर लाईट प्रोटेक्शन)
द्वितीय – विद्यामाता इंग्लिश स्कुल ( पर्यावरण पूरक जीवनशैली)
तृतीय – जिल्हा परिषद प्रा. शा. नागुर (जलशुद्धीकरण यंत्र)
माध्यमिक गट –
प्रथम – जय हनुमान विद्यालय तोरंबा ( कमी जागेत पार्किंग व्यवस्था)
द्वितीय – जिल्हा परिषद शाळा धानुरी ( शेतकऱ्यांचा मित्र – कार्बाईड गन)
तृतीय – धर्मवीर संभाजी विद्यालय भोसगा (जलव्यवस्थापन सूचना यंत्र)
शिक्षक शैक्षणिक साहित्य
प्राथमिक गट
प्रथम – जी. एस. शिंदे ( जि.प. प्रा. शाळा वाडी वडगाव ) गणित विज्ञान कॉम्बो किट
द्वितीय – जी. के. कलशेट्टी ( जि. प. प्रा. शाळा माकणी)
गणितीय शैक्षणिक साहित्य आनंददायी स्व अध्ययन)
तृतीय – एस. के. चिनगुंडे (जि.प. शाळा भोसगा) – जिओ मेट्रिक फन – मनोरंजनातून भौतिक रचना स्पष्टीकरण