Tuesday, October 6, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

खत चोरी प्रकरणी कारवाई न झाल्याने नगरसेवक प्रशांत काळे यांचे उपोषण

by मुख्य संपादक
in लोहारा तालुका
A A
0

लोहारा नगरपंचायतच्या खतनिर्मिती प्रकल्पातून चोरी झालेल्या खत चोरी प्रकरणी चौकशी समितीचा अहवाल येऊन सुद्धा दोषींवर कारवाई झाली नाही म्हणून लोहारा नगरपंचायत कार्यालयासमोर नगरसेवक प्रशांत काळे यांनी गुरुवारी (दि.१३) उपोषण सुरू केले आहे.
लोहारा नगरपंचायतच्या खतनिर्मिती प्रकल्पातून खत चोरीप्रकरणी वेळोवेळी अनेकांनी उपोषण, आंदोलन केले होते. त्यानंतर चौकशी समिती नियुक्त करून सदरील समितीमार्फत चौकशी करण्यात आली होती. या समितीचा अहवाल येऊनही अद्याप कारवाई करण्यात आली नसल्याने गुरुवार (दि.१३) पासून उपोषण सुरू केल्याचे नगरसेवक प्रशांत काळे यांनी सांगितले. याबाबत नगरसेवक प्रशांत काळे यांनी दि. ७ ऑगस्ट रोजी निवेदन दिले होते. जनहिताच्या विविध प्रश्नांसंदर्भात आजपर्यंत नगरपंचायतीकडे सुमारे १० लेखी तक्रारी व अर्ज सादर केले आहेत. मात्र, आजपर्यंत कोणत्याही तक्रारीवर लेखी उत्तर देण्यात आलेले नाही किंवा त्यावर झालेल्या कार्यवाहीची माहितीही देण्यात आलेली नाही. ही बाब लोकशाही मूल्यांच्या तसेच नागरिकांच्या माहितीच्या अधिकाराच्या विरोधात आहे. वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने माझ्याकडे लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. त्यामुळे माझ्या प्रलंबित तक्रारींवर तात्काळ लेखी उत्तर देऊन आवश्यक कार्यवाही करावी. अन्यथा दि.१३ ऑगस्ट पासून नगरपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करणार असा ईशारा या निवेदनात दिला होता. त्यानुसार हे उपोषण करत असल्याचे नगरसेवक प्रशांत काळे यांनी सांगितले. या प्रकरणी यापूर्वी अनेक वेळा उपोषण, विविध आंदोलने झाली आहेत. तरीही प्रशासनाकडून कारवाई का केली जात नाही. चौकशी समितीने अहवाल देऊनही दोषींवर कारवाई होण्यासाठी एवढी दिरंगाई का ? असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे. या प्रकरणी काय कारवाई होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Tags: उपोषणखत चोरीनगरपंचायतलोहारा (बु) नगरपंचायत
Previous Post

शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी योगेश देवकर तर उपाध्यक्षपदी रमेश कदम यांची निवड – शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याचा केला निर्धार

Next Post

पोहनेर येथे ‘जीवन ज्योत महिला ग्राम संघा’ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

Related Posts

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया
लोहारा तालुका

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

Next Post

पोहनेर येथे ‘जीवन ज्योत महिला ग्राम संघा’ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!