Vartadoot
Saturday, August 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा तालुक्यातील जेवळी येथे आजपासून तिन दिवसीय राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा

मुख्य संपादक by मुख्य संपादक
08/05/2024
in लोहारा तालुका
A A
0
लोहारा तालुक्यातील जेवळी येथे आजपासून तिन दिवसीय राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा
Ad 10

लोहारा (lohara) तालुक्यातील जेवळी (jewli) येथे ग्रामदैवत महात्मा बसवेश्वरांच्या यात्रेनिमीत्त दि. ८ ते १० मे या कालावधीत सालाबादप्रमाणे राज्यस्तरीय खुल्या नृत्य स्पर्धेचे आयोजीत करण्यात आले आहे. या तीन दिवसीय राज्यस्तरीय खुल्या नृत्य स्पर्धेसाठी यात्रा समितीच्या वतीने विजेत्यांसाठी एकूण दोन लाख रुपयाचे रोख पारितोषिक व चषक ठेवण्यात आले आहे.
ग्रामदैवत महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीनिमित्त तालुक्यातील जेवळी येथे अक्षयतृतीयापासुन तीन दिवस मोठी यात्रा भरते. या यात्रेनिमित्त येथे विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. यावर्षी ही यात्रा दि. १० ते १२ या कालावधीत पार पडत आहे. गेल्या सोळा वर्षापासून यात्रा समितीच्या वतीने राजस्तरीय नृत्य स्पर्धा घेतली जात आहे. या स्पर्धेसाठी राज्यभरातून स्पर्धक सहभागी होतात. या वर्षी बुधवारी (दि.८) पासून या स्पर्धेला सुरुवात होत असून या दिवशी सोळा वर्षी खालील (बालगट) वैयक्तिक व समूह नृत्य स्पर्धा पार पडणार आहे. यात वैयक्तिक बालगट विजेत्यांना प्रथम पारितोषिक सात हजार रुपये, द्वितीय पाच हजार, तृतीय तीन हजार पाचशे रुपये व चषक देण्यात येणार आहे. याच दिवशी बाल समुह नृत्य स्पर्धा होणार आहे. यासाठी विजेत्यांना प्रथम पारितोषिक अकरा हजार, द्वितीय सात हजार, तर तृतीय पारितोषिक पाच हजार रुपये देण्यात येणार आहे. गुरुवारी (दि.९) प्रौढ गटातील नृत्य स्पर्धा होईल. यात लावणी व वैयक्तिक नृत्य (स्त्री) स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक पंधरा हजार रुपये, द्वितीय दहा हजार, तृतीय सात हजार रुपये ठेवण्यात आली आहे. याच दिवशी पुरुष लावणी व वैयक्तिक नृत्य स्पर्धाही होईल. यासाठी प्रथम पारितोषिक दहा हजार, द्वितीय सात हजार, तृतीय पाच हजार रुपये ठेवण्यात आले आहे. शुक्रवारी (दि.१०) प्रौढ गटातील युगल नृत्य व समुह नृत्य स्पर्धा होईल. युगल नृत्यासाठी प्रथम पारितोषिक दहा हजार, द्वितीय सात हजार, तृतीय पाच हजार रुपये ठेवण्यात आले आहे. याच दिवशी होणाऱ्या प्रौढ गटातील समुह नृत्यस्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक हे तेत्तीस हजार, द्वितीय पंचवीस हजार, तृतीय एकवीस हजार रुपये व चषक ठेवण्यात आले आहे. अशी माहिती यात्रा समितीच्या वतिने देण्यात आली आहे. या यात्रेनिमित्त दरवर्षी प्रमाणे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: जेवळीमहात्मा बसवेश्वर महाराज जयंतीराज्यस्तरीय नृत्य स्पर्धा
Previous Post

शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झाल्याबद्दल विद्यार्थ्याचा शाळेत सत्कार

Next Post

जेवळी येथील तीन दिवसीय यात्रा महोत्सवास आजपासून सुरुवात

Related Posts

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी
लोहारा तालुका

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी

26/07/2026
आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी
लोहारा तालुका

आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी

26/07/2026
वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी
लोहारा तालुका

वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी

25/07/2026
Auto Draft
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत आषाढी दिंडी सोहळा

25/07/2026
हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

24/07/2026
लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान
लोहारा तालुका

लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान

23/07/2026
Next Post
लोहारा तालुक्यातील जेवळी येथे आजपासून तिन दिवसीय राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा

जेवळी येथील तीन दिवसीय यात्रा महोत्सवास आजपासून सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's