वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमरगा तालुक्यातील मुरूम येथील प्रा. डॉ. महेश मोटे यांना अमेरिकेतील ग्लोबल पीस युनिव्हर्सिटीच्या वतीने डी. लीट पदवी मिळाल्याबद्दल व लातूरचे प्रा. डॉ. श्रीकांत गायकवाड यांची जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाच्या कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली. त्याबद्दल उमरगा-लोहारा तालुक्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते रविवारी (दि. १) उमरगा येथे सत्कार करण्यात आला. प्रा. डॉ. मोटे हे महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे जिल्हा प्रतिनिधी तथा महाराष्ट्र पत्रकार संघाचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष म्हणूनही गेल्या अनेक वर्षापासून कार्य करीत आहेत. त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना ग्लोबल पीस युनिव्हर्सिटी, अमेरिका यांच्याकडून मानद डॉक्टरेट ऑफ लिटरेचर पदवी प्रदान करण्यात आली. तसेच प्रा. डॉ. श्रीकांत गायकवाड हे विविध सामाजिक, साहित्यिक, शैक्षणिक, मराठवाडा जनता विकास परिषद, वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक संघटना, उपेक्षितांच्या चळवळीमध्ये सक्रिय सहभाग आहे. ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठाच्या समाजशास्त्र अभ्यास मंडळाचे विद्यमान सदस्य असून लातूर येथील महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात समाजशास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या विविध क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांची जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाच्या कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली. त्याबद्दल आमदार चौगुले यांनी त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस सदिच्छा दिल्या. यावेळी रोटरीचे माजी सचिव प्रा. युसुफ मुल्ला, नगरसेवक पंढरीनाथ कोने, शरद पवार, प्रभाकर गायकवाड, सुरेश झाकडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.