वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमरगा तालुक्यातील मुरूम शहरात वीरशैव कक्कय्या महाराज यांची जयंती वीर कक्कय्या महाराज प्रतिष्ठाणच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात मंगळवारी (दि.१ ) उत्साहात साजरी करण्यात आली. ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. बसव प्रतिष्ठाणचे अध्यक्ष रामलिंग पुराणे, ग्रामीण रुग्णालयाचे समुपदेशक संतोष थोरात, दत्ता चौगुले आदींच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. किरण गायकवाड, आनंद कांबळे, देवराज संगुळगे आदींनी मनोगत व्यक्त केले. बाबा खरटमल, दत्ता खरटमल, विनोद कोकणे, सुनील खरटमल, धनराज शिंदे, ज्योतिर्लिंग शिंदे, गिरीश शिंदे, मनोज शिंदे, धीरज शिंदे, मल्हारी कटके, श्रवण कोकणे, बाबूस खरटमल, दिंगबर सोनटक्के आदी उपस्थित होते.मुरूम येथील शिंदे गल्लीत वीर कक्कय्या महाराज जयंती साजरी
मुरूम येथील शिंदे गल्लीतील समाज मंदिरात वीर कक्कय्या महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी बसव प्रतिष्ठाणचे अध्यक्ष रामलिंग पुराणे यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन प्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी तुकाराम शिंदे, ज्योतिर्लिंग शिंदे, विनोद कोकणे, सूरज शिंदे, मनोज शिंदे, गिरीश शिंदे, वैभव कटके, धनराज शिंदे, विशाल चौगुले, महादेवी शिंदे, सुलभा कटके, जयश्री कावळे, सरस्वती शिंदे, जिजाबाई शिंदे, शुसाबाई शिंदे, लक्ष्मी शिंदे आदी उपस्थित होत्या.