Vartadoot
Saturday, August 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोकमंगल कारखान्याने २५ जुलै पर्यंत शेतकऱ्यांच्या ऊसाची बिले दिली नाहीत तर राष्ट्रवादी काँग्रेस करणार तीव्र आंदोलन – तहसीलदार संतोष रुईकर यांना दिले निवेदन

admin by admin
16/07/2021
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
शेतकऱ्यांनी लोकमंगल कारखान्याला दिलेल्या ऊसाचे बिल दिले गेले नाही. त्यामुळे कारखाना प्रशासनाने २५ जुलै पर्यंत शेतकऱ्यांना बिल दिले नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कारखान्यासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे. गुरुवारी (दि.१५) तहसीलदार संतोष रुईकर यांना हे निवेदन देण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने यापूर्वी ३० जून रोजी निवेदन दिले होते. या निवेदनात म्हटले होते की, घराघरात कोरोनाचे पेशंट निघत असताना शेतकऱ्यांना खाजगी सावकारांचे उंबरठे झिझवावे लागले. परंतु पोटाला चिमटा मारून कष्टाने पिकवलेल्या ऊसाचे पैसे मिळालेच नाहीत. आता पेरणीसाठी उदारीने बि – बियाणे, खते किटकनाशके सारख्या इतर बाबीसाठी बळीराजा हवालदिल झाला आहे. उस्मानाबाद जिल्हा शेतकरी आत्महत्यांसाठी देशात आघाडीवर आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नये. पुढील दहा दिवसांत शेतकऱ्यांचे ऊस बिलाचे पैसे मिळाले नाही तर या अन्यायाविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस व शेतकऱ्यांच्या वतीने कारखाण्याविरुद्ध तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा ईशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. परंतु त्यानंतर कारखाना प्रशासनाकडून पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. या चर्चेमध्ये १५ जुलै पर्यंत आम्ही बिले काढणार आहोत. त्यामुळे आंदोलन करू नका असे सांगण्यात आले होते अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी यांनी सांगितली. परंतु कारखान्याने अर्धेच बिले काढून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. आम्हाला शेतकऱ्यांची सत्तर टक्के बीले काढली आहेत असं सांगितले जात आहे. परंतू वास्तवात असं नाही. शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. त्यामुळे २५ जुलै पर्यत बिले दिली नाहीत तर २७ जुलैला कारखानास्थळी आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत व याची सर्वस्वी जबाबदारी लोकमंगल कारखाना आणि प्रशासनावर राहील असा ईशारा गुरुवारी (दि.१५) दिलेल्या निवेदनात दिला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनिल साळुंके, विधानसभा अध्यक्ष विजय लोमटे, जिल्हा कोषाध्यक्ष जगदिश पाटील, ज्येष्ठ नेते नागन्ना वकील, शहराध्यक्ष आयुब शेख, दादा पाटील, नवाज सय्यद, प्रकाश भगत, स्वप्नील माटे, रवी राठोड, सचिन रणखांब, प्रशांत हाके आदी उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: राष्ट्रवादी काँग्रेसलोकमंगल
Previous Post

मोठी बातमी – पीक विमा भरण्यास 23 जुलै पर्यंत मुदतवाढ – शेतकऱ्यांना मोठा दिलासा

Next Post

निलंगा तालुक्यातील दादगी येथे आर्थिक साक्षरता प्रशिक्षण संपन्न – उमेदचे तालुका अभियान व्यवस्थापक भगवान अंकुश यांनी केले मार्गदर्शन

Related Posts

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी
लोहारा तालुका

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी

26/07/2026
आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी
लोहारा तालुका

आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी

26/07/2026
वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी
लोहारा तालुका

वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी

25/07/2026
Auto Draft
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत आषाढी दिंडी सोहळा

25/07/2026
हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

24/07/2026
लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान
लोहारा तालुका

लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान

23/07/2026
Next Post

निलंगा तालुक्यातील दादगी येथे आर्थिक साक्षरता प्रशिक्षण संपन्न - उमेदचे तालुका अभियान व्यवस्थापक भगवान अंकुश यांनी केले मार्गदर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's