Vartadoot
Wednesday, June 17, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा येथील न्यू व्हिजन स्कुलमध्ये वाचन प्रेरणा दिन व जागतिक हात धुवा दिन साजरा

admin by admin
15/10/2022
in लोहारा तालुका, शैक्षणिक
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा येथील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी (दि.१५) वाचन प्रेरणा दिन व जागतिक हात धुवा दिन साजरा करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. यशवंत चंदनशिवे म्हणाले की, डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म अतिशय सामान्य कुटुंबात झाला होता. बालपणी दररोज सकाळी ते लोकांच्या घरी पेपर वाटण्याचे काम करून नंतर शाळेत जायचे. त्यांनाही वाचनाची खूप आवड होती. त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य आपल्या राष्ट्रासाठी अर्पण केले आणि शिक्षणाच्या व स्वतःच्या कर्तृत्वाच्या बळावर त्यांनी देशाच्या सर्वोच्च पद म्हणजे राष्ट्रपतीपद भूषविले. त्यांनी अनेक संशोधन केले व रॉकेट , अणुबॉम्ब तयार करून जगामध्ये आपल्या देशाचा दबदबा निर्माण करणारे ते थोर शास्त्रज्ञ होते. त्यामुळेच त्यांची मिसाईल मॅन म्हणून ओळख निर्माण झाली. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारने त्यांना भारतरत्न हा पुरस्कार प्रदान केला. अशा या महान व्यक्तीचा जन्म दिवस हा आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो असे सांगून त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. यावेळी स्कूलमधील इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतचे १४५ विद्यार्थी व १५ शिक्षक कर्मचारी यांनी १ तास विविध पुस्तकांचे वाचन केले. यानंतर मुख्याध्यापक शहाजी जाधव यांनी जागतिक “हात धुवा दिन” याची माहिती सांगून आरोग्य विभागाच्या नियमानुसार हात कसे धुवावेत याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. दररोज सर्व विद्यार्थ्यांनी शौचास जावून आल्यानंतर व जेवना अगोदर याप्रकारे स्वच्छ हात धुवावे व स्वच्छतेचे महत्व सांगितले. याप्रसंगी सविता जाधव, संचीता बाचपल्ले, मयुरी नारायणकर, माधवी होगाडे, संतोषी घंटे, सारिका पवार, मीरा माने, शिवानी बिडवे, चांदबी चाऊस, अस्मिता देवकते, सिद्धेश्वर सुरवसे, व्यंकटेश पोतदार, सोमनाथ कुसळकर, प्रेमनाथ राठोड, विजय कांबळे उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: न्यू व्हिजन इंग्लिश स्कुलवाचन प्रेरणा दिन
Previous Post

राज्यस्तरीय वाद-विवाद स्पर्धेत नांदेडच्या यशवंत महाविद्यालयाने मारली बाजी

Next Post

जेवळी (दक्षिण ) येथील श्री बसवेश्वर गणेश मंडळ आयोजित विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न

Related Posts

सर्वधर्म समभाव जपत बाळासाहेब ठाकरे कन्या सन्मान योजनेतून मुस्लिम समाजातील नववधूस ५ ग्रॅम सोन्याची अंगठी
लोहारा तालुका

सर्वधर्म समभाव जपत बाळासाहेब ठाकरे कन्या सन्मान योजनेतून मुस्लिम समाजातील नववधूस ५ ग्रॅम सोन्याची अंगठी

17/06/2026
लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत, पाठ्यपुस्तक वितरण
लोहारा तालुका

लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव व नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत, पाठ्यपुस्तक वितरण

16/06/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत प्रवेशोत्सव

16/06/2026
कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी करण्यात यावी – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श. प.) यांच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी
लोहारा तालुका

कर्जमाफी योजनेतील जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी करण्यात यावी – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श. प.) यांच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी

13/06/2026
माकणी येथील भारत विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा; तब्बल २५ वर्षांनी वर्गमित्र एकत्र
लोहारा तालुका

माकणी येथील भारत विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा; तब्बल २५ वर्षांनी वर्गमित्र एकत्र

12/06/2026
झेप किशोरी विकास प्रकल्पांतर्गत गरजू मुलींना शेळ्या, सायकल, शिलाई मशीन व शैक्षणिक साहित्याचे वाटप
लोहारा तालुका

झेप किशोरी विकास प्रकल्पांतर्गत गरजू मुलींना शेळ्या, सायकल, शिलाई मशीन व शैक्षणिक साहित्याचे वाटप

11/06/2026
Next Post

जेवळी (दक्षिण ) येथील श्री बसवेश्वर गणेश मंडळ आयोजित विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's