वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरातील भारतमाता मंदिर येथे रविवारी (दि. २७) महाराष्ट्र नवनिर्मान सेनाची लोहारा तालुका बैठक घेण्यात आली. या बैठकीत युवकांनी मनसेत प्रवेश केला.
शहरातील भारतमाता मंदिरात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीसाठी जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे, जिल्हा उपाध्यक्ष अविनाश साळुंके, तालुकाध्यक्ष अतुल जाधव यांची प्रमुख उपस्थीती होती. यावेळी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या संदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच २ एप्रिल रोजी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क शिवतीर्थ येथे होत असलेल्या पाडवा मेळाव्यासाठी जाण्यासाठी चर्चा करण्यात आली. या बैठकीत शहरातील युवकांनी मनसेत प्रवेश केला. तसेच दत्ता शिंदे यांची तालुका उपाध्यक्षपदी तर रामानंद माळी, सुरेश गवळी यांची विभाग अध्यक्षपदी निवड करण्यात आली.