वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमरगा तालुक्यातील मुरूम येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत मंगळवारी (दि. ८) जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयात राष्ट्रमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस प्रा. डॉ. जयश्री सोमवंशी व प्रा. डॉ. संध्या डांगे यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अशोक सपाटे होते. यावेळी महाविद्यालयातील महिला सहकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. देशाच्या विकासाला चालना देणाऱ्या महिलाचे योगदान या विषयावर प्रा. डॉ. सायबण्णा घोडके यांचे व्याख्यान झाले. या प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. रवि आळंगे, प्रा. डी. एस. बिराजदार, प्रा. डॉ. महेश मोटे, डॉ. विनायक रासुरे, डॉ. राजेंद्र गणापूरे, डॉ. भिलसिंग जाधव, डॉ. अरविंद बिराजदार, प्रा. गोपाळ कुलकर्णी, प्रा. सुजित मठकरी, डॉ. सुशील मठपती, प्रा. नाना बेंडकाळे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रवि आळंगे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. आप्पासाहेब सुर्यवंशी तर आभार प्रा. भूषण पाताळे यांनी मानले. महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद व विद्यार्थी- विद्यार्थीनी उपस्थित होत्या.